Video : डॉक्टरचा खेळ पुन्हा सुरु होणार, पण..; ‘देवमाणूस’ नवा प्रोमो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 04:20 PM2022-09-16T16:20:33+5:302022-09-16T16:29:42+5:30

Devmanus: डॉक्टर अजित कुमार देव याची 'देवमाणूस' मालिका विशेष गाजली. आता या मालिकेबाबत एक नवी माहिती समोर आली आहे.

Zee marathi popular serial Devmanus telecast in hindi on and tv | Video : डॉक्टरचा खेळ पुन्हा सुरु होणार, पण..; ‘देवमाणूस’ नवा प्रोमो व्हायरल

Video : डॉक्टरचा खेळ पुन्हा सुरु होणार, पण..; ‘देवमाणूस’ नवा प्रोमो व्हायरल

googlenewsNext

Devmanus 2 : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'देवमाणूस' (Devmanus)ने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. या मालिकेतील पात्रदेखील खूप चर्चेत आली होती. या मालिकेमध्ये डॉक्टर अजित कुमार देव अनेकांना फसवताना दाखवण्यात आले आहे. या मालिकेच्या पहिल्या भागाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यालादेखील चांगला प्रतिसाद मिळाला. आता या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.आता देवमाणूसबाबत एक नवी माहिती समोर आली आहे. 

देवमाणूस ही मालिका आता हिंदीत येणार आहे. या मालिकेचा हिंदीमधील प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे. विशेष म्हणजे हिंदी मालिकेत अभिनेता किरण गायकवाडच हिंदी मालिकेमध्येही काम करताना दिसेल. अँड टीव्ही वाहिनीवर ही मालिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ‘

मालिकेचा प्रोमो प्रदर्शित होताच यूजर्सनी यावर कमेंट केल्या आहेत. येत्या २४ सप्टेंबरपासून रात्री आठ वाजता ही मालिका प्रसारित होईल. मराठीमध्ये या मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवली. आता हिंदीमध्ये या मालिकेला कितपत प्रतिसाद मिळणार हे पाहावं लागेल.


दरम्यान देवमाणूस मालिकेच्या जागी सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आपल्याला नेहमीच भविष्यकाळात काय घडणार या विषयी कुतूहल असतं आणि भविष्य आपल्याला दिसू लागलं तर त्याचं आश्चर्यच वाटेल. अगदी असंच सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेतील नेत्राच्या आयुष्यात घडलंय. नेत्रा भविष्यात जे घडणार आहे, त्याबद्दल बोलते. पण लोक तिला समजून न घेता तिच्यावर दोषारोप करतात, त्यामुळे नेत्राला प्रत्येक वेळी नव्या आव्हानाला सामोरं जावं लागतं. अशा या नेत्राची गोष्ट पहायला मिळणार आहे.

Web Title: Zee marathi popular serial Devmanus telecast in hindi on and tv

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.