Mazhi Tuzhi Reshimgaath : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ घेणार प्रेक्षकांचा निरोप, या दिवशी प्रसारित होणार अखेरचा एपिसोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2022 13:55 IST2022-08-31T10:26:02+5:302022-08-31T13:55:55+5:30
Mazhi Tuzhi Reshimgaath : गेल्या काही दिवसांत ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत एक ना अनेक ट्विस्ट पाहायला मिळाले. पण आता या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक निराश करणारी बातमी आहे.

Mazhi Tuzhi Reshimgaath : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ घेणार प्रेक्षकांचा निरोप, या दिवशी प्रसारित होणार अखेरचा एपिसोड
‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Mazhi Tuzhi Reshimgaath ) हा प्रेक्षकांची आवडती मालिका. सध्या ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. गेल्या काही दिवसांत या मालिकेत एक ना अनेक ट्विस्ट पाहायला मिळाले. पण आता या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक निराश करणारी बातमी आहे. होय, यश व नेहाच्या प्रेमाची कथा सांगणारी ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं कळतंय.
सध्या मालिकेत यश व नेहाच्या नात्यात दुरावा आल्याचं पाहायला मिळत आहे. अविनाश हा नेहाचा पहिला नवरा असल्याचं सत्य यशसमोर आल्याने आता यश व नेहाच्या नात्यात दुरावा आला आहे. त्यामुळे नेहा परील घेऊन चाळीत राहायला जाणार आहे. यश आणि नेहाच्या नात्यात दुरावा आल्याने परीच्या मनावर याचा परिणाम होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
परीला तिचा खरा बाबा कोण हे कळल्यानंतर आता मालिकेत पुढे काय होईल? यश व नेहा शिवाय परी आणि यश यांच्यात दुरावा येईल का? या प्रश्नांची उत्तरं मालिकेत मिळतीलच. पण आता ही मालिका निरोप घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
‘मराठी सीरिअल्स ऑफिशिअल’ने शेअर केलेल्या पोस्टनुसार, झी मराठीची ही लोकप्रिय मालिका संपणार आहे. येत्या 18 सप्टेंबरला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. ही बातमी चाहत्यांची निराशा करू शकते.
श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. तसेच या मालिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे नेहाची गोड मुलगी अर्थात परी. परीची भूमिका साकारणारी मायरा वायकुळने आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.
‘माझी तुझी रेशीमगाठ’ च्या जागी येणार ही नवी मालिका?
‘माझी तुझी रेशीमगाठ’ च्या जागी ‘दार उघड बये’ ही नवी मालिका सुरू होण्याची शक्यता आहे. ‘दार उघड बये’ ही मालिका येत्या 19 सप्टेंबरपासून सुरू होतेय.