Shreya Bugade : उषा नाडकर्णींचा फोन आला अन् श्रेया बुगडे घाबरली..., पुढे काय झालं VIDEO बघा...!!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 04:45 PM2022-09-19T16:45:29+5:302022-09-19T16:48:45+5:30
Bus Bai Bus, Shreya Bugade : एकदा श्रेयाने उषा ताईंची मिमिक्री केली आणि नंतर बघते काय तर खुद्द उषा ताईंचा फोन. फोन कशासाठी आला, ते श्रेयाने लगेच हेरलं. मग काय?
झी मराठीवरील ‘बस बाई बस’ ( Bus Bai Bus) या अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या कार्यक्रमात नुकतीच कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे (Shreya Bugade ) सहभागी झाली होती. ‘बस बाई बस’च्या मंचावर श्रेया आल्यानंतर काय होणार? धम्माल मस्ती झाली. यावेळी श्रेयाने अनेक रंजक खुलासे केले. काही मजेशीर किस्से सांगितले. यातला एक किस्सा चांगलाच मजेशीर आहे.
श्रेया उषा नाडकर्णींची (Usha Nadkarni ) मिमिक्री छान करते. एकदा श्रेयाने उषा ताईंची अशीच मिमिक्री केली आणि नंतर बघते काय तर खुद्द उषा ताईंचा फोन. फोन कशासाठी आला, ते श्रेयाने लगेच हेरलं. मग काय? श्रेयाने फोन घेतला आणि स्वत:च सुरूवात केली.
श्रेयाने हा किस्सा भलताच रंगवून सांगितला. अगदी उषा नाडकर्णी स्टाईलमध्ये फोन आल्यावर काय झालं, ते तिने सांगितलं.
श्रेया म्हणाली, मला उषा ताईंचा फोन आला. मी फोन घेतला आणि थेट बोलायला सुरूवात केली. तुला मला काय बोलायचं ते बोल, मला माहितीये माझी चूक झाली. मी परत कधी असं काहीही करणार नाही. तुला मला मारायचं तर माल...तू बोलून... असं मी उषा ताईंना म्हणाले. कारण फोन कशासाठी आला ते मला माहित होतं. त्यांनी माझं ऐकून घेतलं. काहीवेळ काहीच रिस्पॉन्स नाही. मग त्या पलीकडून बोलू लागल्या. काय झालं गं... अगं बरं केलंस तू, छान करतेस. मी काही ते बघितलं नाही. मला कुणीतरी फोन केला, अगं ती श्रेया बुगडे तुझं करतीये बघ. म्हणून मी बघितलं. छान करतेस तू. दुसरं कुणी केलं ना तर ते नाही मी खपवून घेणार, असं उषा नाडकर्णी पलीकडून म्हणाल्या. श्रेयाने उषा ताईंच्या अंदाजात हा किस्सा सांगितला.
श्रेया बुगडेला वाटते 'या' गोष्टीची भीती
तू रात्री एकटी असताना कार्टून लावून का बसतेस? असा प्रश्न श्रेयाला या कार्यक्रमात विचारण्यात आला. त्यावर ती स्पष्टीकरण देत म्हणाली, ‘मला भुतांची खूप भीती वाटते. रात्री मी एकटी असले आणि कुठून काही आवाज आला तर मला खूप भीती वाटते. म्हणून मी कार्टून लावून बसते. हे ऐकून सुबोधने तिची चांगलीच फिरकी घेतली. तो म्हणाला रात्री भुतं कार्टूनच्या रूपात सुद्धा येऊ शकतात.... महेश कोठारेंच्या सिनेमात भूत बाहुल्याच्या रूपात आलं होतं. तसं तुझ्यासमोर येईल. तुला वाटेल ते कार्टून आहे पण ते भूत असू शकतं.... सुबोधचं बोलणं ऐकून श्रेया चांगलीच घाबरली, मात्र ‘बस बाई बस’च्या मंचावर हशा पिकला.