प्रेक्षकांची मागणी 'झी मराठी'नं केली मान्य, ही लोकप्रिय मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 09:22 AM2022-09-16T09:22:35+5:302022-09-16T09:33:42+5:30
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका अचानक मालिका बंद होण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मालिकेचे चाहते नाराज झाले होते. याची दखल 'झी'कडून घेण्यात आली.
गेल्या काही महिन्यात झी मराठी (Zee Marathi)या वाहिनीवर अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आल्यात. अर्थात टीआरपीच्या रेसमध्ये टिकायचं तर हे गरजेचं आहे. गेल्या काही दिवसांत तू चाल पुढं. अप्पी आमची कलेक्टर अशा नव्या मालिका सुरू झाल्या. लवकरच ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ आणि‘दार उघड बये’ (Dar Ughad Baye) या मालिका सुरु होणार आहेत. नवी मालिका सुरु होणार म्हणजेच अर्थातच जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार होती.
छोट्या पडद्यावरील मराठी मालिकांचा एक मोठा चाहता वर्ग आहे. हा प्रेक्षक मायबाप मालिकांवर प्रचंड प्रेम करतो. पण प्रसंगी संतापतो देखील. मालिकांमध्ये तेच ते कथानक, मनाला न पटणारी दृश्य, अतिशयोक्ती दाखवली की प्रेक्षक नाराज होतात. पण सध्या झी मराठी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार म्हणून चाहते नाराज झाले होते. सोशल मीडियावर त्यांनी ही मालिका बंद करु नका अशी थेट विनंती केली गेली होती. अखेर वाहिनींनी प्रेक्षकांचं मालिकेवरील प्रेम पाहून मालिका बंद न करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘दार उघड बये’ ही मालिका १९ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार म्हणून लोकप्रिय मालिका माझी तुझी रेशीमगाठ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार होती. ही मालिका सुरु झाल्यापासून त्यातील कलाकार मंडळी कायम चर्चेत होती मग तो यशवर्धन, समीर असुदे, नेहा किंवा छोटी परी. या मालिकेच्या शेवटच्या टप्प्यातले शूटिंग केल्याची पोस्ट कलाकारांनी सोशल मिडीयावर शेयर केल्या. पण अचानक मालिका बंद होण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मालिकेचे चाहते नाराज झाले आणि सोशल मिडियावर अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या.
या सगळ्यांची दखल घेत वाहिनीने आणि निर्मात्यांनी मालिका बंद न करण्याचा निर्णय घेतलाय, हो हे खरं आहे, प्रेक्षकांची आवडती ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका बंद होणार नसून या मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे. ही मालिका झी मराठीवर १९ सप्टेंबरपासून नव्या वेळेत म्हणजेच संध्याकाळी ६.३० वा. प्रसारित होणार आहे. आणि महाराष्ट्राचे लाडके भावोजी आपल्या भेटीला येतील संध्या. ६ वा