झी टॉकीज कॉमेडी अवॉर्डचा मंचावर होणार धमाल; 'ऊ अंटावा' वर एमी एलासोबत थिरकणार ४ ज्येष्ठ अभिनेते
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 14:21 IST2022-10-07T13:34:55+5:302022-10-07T14:21:13+5:30
अभिनेत्री एमी एला आणि मराठीतील चार ज्येष्ठ अभिनेत्यांच्या डान्समध्ये करणार आहे.

झी टॉकीज कॉमेडी अवॉर्डचा मंचावर होणार धमाल; 'ऊ अंटावा' वर एमी एलासोबत थिरकणार ४ ज्येष्ठ अभिनेते
झुकेगा नही साला म्हणत साऊथच्या पुष्पराजने धुमाकूळ घातला होता. या सिनेमातील ऊ अंटवा मावा ऊ ऊ अंटवा मावा गाण्यावर थिरकणारी समांथा आठवली का? आणि तिला थिरकायला लावणाऱ्या पुष्पाचा रोमँटीक अंदाज तर काय विचारूच नका. लवकरच हिंदी मधील सुंदर अभिनेत्री एमी एला आणि मराठीतील चार ज्येष्ठ अभिनेत्यांच्या डान्समध्ये उतरणार आहे.
आजच्या तरूणाईला लाजवत चार ज्येष्ठ अभिनेते झी टॉकीज कॉमेडी अॅवार्डच्या स्टेजवर एमी एला बरोबर नाचून आग लावणार आहेत. अभिनेत्यांची ही चौकडी आहे सुनील तावडे, विजय कदम, विजय पाटकर आणि जयवंत वाडकर यांची. हे चौघेजण स्टेजवर यही उमर है कर ले गलती से मिस्टेक म्हणत ठेका धरणार आहेत. मराठीतील विनोदी नाटक आणि सिनेमांसाठी पुरस्कारांची बरसात करणाऱ्या झी टॉकीज कॉमेडी अॅवार्ड सोहळ्याचा काउंटडाउन सुरू झाला आहे.
येत्या ९ ऑक्टोबरला दुपारी १२ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता हा सोहळा रंगणार आहे. झी टॉकीज वाहिनीने मराठी मनोरंजन विश्वात यंदा १५ वर्षे पूर्ण केली आहेत. तर विनोदी कलाकार, नाटक, सिनेमे यांना गौरवण्यासाठी झी टॉकीज वाहिनीतर्फे गेल्या सात वर्षापासून झी टॉकीज कॉमेडी अॅवार्ड सोहळयाचं आयोजन केलं जातं. दरवर्षी झी टॉकीज कॉमेडी अॅवार्डमध्ये कुणाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार , याची प्रेक्षकांना आणि चाहत्यांना कमालीची उत्सुकता असते.
विनोदी सिनेमा, नाटक, कलाकार यांना सन्मानित करण्याबरोबच झी टॉकीज कॉमेडी अॅवार्डच्या मंचावर मनोरंजनाची मुसळधार बरसात होणार आहे. विनोदवीर दादा कोंडके यांच्या सिनेमातील हसून लोटपोट करणारे संवाद, ठसकेबाज गाणी यांची पर्वणी तर आहेच पण ज्येष्ठ अभिनेत्यांची सेकंड इनिंगही आयटम साँगवर थिरकण्यासाठी सज्ज झाली आहे. झी टॉकीज कॉमेडी अॅवार्डच्या यंदाच्या खास सोहळ्यातील मऱ्हाठमोळ्या कार्यक्रमांना साउथचा तडका देण्यासाठी मराठीतील चार विनोदी अभिनेते हम भी कुछ कम नही म्हणत ठेका धरणार आहेत.