झी युवाच्या कट्टी बट्टीने पूर्ण केले १०० भाग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2018 06:47 AM2018-06-20T06:47:00+5:302018-06-20T12:17:00+5:30
युथफूल कन्टेन्टने सर्व रसिक प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणाऱ्या झी युवा या वाहिनीने अगदी कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला ...
य थफूल कन्टेन्टने सर्व रसिक प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणाऱ्या झी युवा या वाहिनीने अगदी कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. झी युवावरील प्रत्येक मालिका आणि त्यातील पात्रं ही महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आणि त्यांच्या कुटुंबाचा एक अविभाज्य भागच बनली आहेत. झी युवाने अहमदनगर मध्ये राहणाऱ्या पूर्वा आणि पराग यांच्या मोडलेल्या लग्नाची आणि जुळलेल्या प्रेमाची गोष्ट 'कट्टी बट्टी' प्रेक्षकांच्या भेटीस आणली. लोकप्रियतेचा शिखर गाठलेल्या कट्टी बट्टी या मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दर्शवली. कट्टी बट्टीने नुकताच १०० एपिसोडचा पहिला यशस्वी टप्पा पूर्ण केला आहे. हा आनंद संपूर्ण टीमने एकत्र येऊन केक कापून साजरा केला.
१०० वा एपिसोड पूर्ण केल्याबद्दलची उत्सुकता सांगत अश्विनी कासारने सांगितले, “प्रेक्षकांनी या मालिकेला पसंती दर्शवली याचा आम्हाला सर्वांना खूप आनंद आहे. या मालिकेची संपूर्ण टीम म्हणजे आमचं विस्तारित कुटुंबच आहे आणि त्यांच्या सोबतच हा आनंद साजरा केला. कारण या मागे प्रत्येकाची मेहनत आणि चिकाटी आहे.”
या आनंदाच्या क्षणी बोलताना पुष्कर सरदने सांगितले, "१०० एपिसोडचा टप्पा गाठल्यामुळे आम्हाला सर्वांना आनंद झाला आहे आणि त्यासाठी मला आम्हाला पाठिंबा देणाऱ्या आणि आमच्यावर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या प्रेक्षकांना धन्यवाद करायचं आहे.”
'नवे पर्व युवा सर्व' हे ब्रीद वाक्य घेऊन झी युवा या वाहिनीने नेहमीच रसिक प्रेक्षकांसाठी उत्तमोत्तम मालिका आणल्या आणि प्रेक्षकांनी त्या मालिकांना मनापासून पसंतीसुद्धा दिली. या मालिकांमध्ये प्रेमाच्या वेगवेगळ्या छटा प्रेक्षकांना अनुभवायला मिळाल्या. प्रेम ही भावनाच अशी आहे, ज्यापासून कोणीही दूर राहू शकलेला नाही. झी युवा या वाहिनीने अहमदनगरमध्ये राहणाऱ्या पूर्वा आणि पराग यांच्या मोडलेल्या लग्नाची आणि जुळलेल्या प्रेमाची गोष्ट 'कट्टी बट्टी' प्रेक्षकांच्या भेटीस आणली. प्रेक्षक सहकुटुंब ही मालिका पाहून त्यात घडणाऱ्या रोजच्या आयुष्यातील गंमतीजंमतींचा मनसोक्त आस्वाद घेत आहेत.
Also Read : कट्टी बट्टी फेम अश्विनी कासार खऱ्या आयुष्यात आहे उच्चशिक्षित, तिच्या पदव्या ऐकून तुम्ही व्हाल चकित...