झी युवा वर संगीत सम्राट पर्व २ लवकरच
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2018 05:37 AM2018-04-28T05:37:49+5:302018-04-28T11:07:49+5:30
एखाद्या कार्यक्रमाचा पहिला सिझन हिट झाला की, त्याचे पुढील सिझन देखील लगेचच प्रेक्षकांच्या भेटीस येतात. हिंदी वाहिनींप्रमाणे मराठी वाहिनीवर ...
ए ाद्या कार्यक्रमाचा पहिला सिझन हिट झाला की, त्याचे पुढील सिझन देखील लगेचच प्रेक्षकांच्या भेटीस येतात. हिंदी वाहिनींप्रमाणे मराठी वाहिनीवर देखील हा ट्रेंड पाहायला मिळतो. संगीत सम्राट या कार्यक्रमाचा पहिला सिझन प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता. आता या कार्यक्रमाचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत आणि परीक्षकाच्या भूमिकेत प्रेक्षकांना काही नवीन चेहरे पाहायला मिळणार आहेत.
महाराष्ट्राने गेल्या शंभर वर्षांत अभिजात संगीताच्या क्षेत्रात इतकी भरीव अशी कामगिरी केली की, अन्य कोणत्याही प्रांताला त्याचा हेवा वाटेल. हे सारे घडले, याचे कारण महाराष्ट्रातील रसिकाने स्वत:ची जडणघडण करण्यासाठी वैचारिक परंपरेचा आधार घेतला. याचीच दखल घेत, हा बदल आणि आपले संगीत आपल्या लोकांसमोर आणण्यासाठीच झी युवा या वाहिनीने पुढाकार घेत मागील वर्षी संगीत सम्राट पर्व १ या एक हटके पण संगीतमय कार्यक्रमाची निर्मिती केली होती. संगीत सम्राट पर्व १ हा संगीतक्षेत्रातील न भूतो ना भविष्य असा अभूतपूर्व कार्यक्रम घडला आणि महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी त्याचा मनमुराद आनंद घेतला. महाराष्ट्रभर या कार्यक्रमाची प्रशंसासुद्धा झाली. आता पुन्हा संगीताची तीच जादू दाखवायला संगीत सम्राट पर्व २ येत आहे. संगीत सम्राट पर्व १ ने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांतील उत्तम कलाकारांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते. तेच व्यासपीठ आणखी मोठ्या स्तरावर झी युवा महाराष्ट्रातील त्या असंख्य, संगीत क्षेत्रात स्वतःचे अस्तित्व दाखवण्यासाठी एका संधीची, वाट पाहणाऱ्या कलाकारांसाठी लवकरच घेऊन येत आहे. या वेळी सुद्धा महाराष्ट्रभर झी युवा ऑडिशन घेणार आहे. संगीत सम्राट पर्व १ मध्ये ज्याप्रमाणे आधुनिक संगीत आणि पारंपरिक संगीत यांच्या मिलापाने रसिक प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेतला होता त्याच प्रमाणे संगीत सम्राट पर्व २ सुद्धा स्वतःची एक वेगळी जागा निर्माण करेल आणि महाराष्ट्रातील सर्वोत्तम टॅलेंट प्रेक्षकांपर्यंत आणेल अशी या कार्यक्रमाच्या टीमला खात्री आहे.
अहमदनगरमधील नंदिनी अंगद गायकवाड आणि अंजली अंगद गायकवाड या दोन सख्ख्या बहिणींनी संगीत सम्राट पर्व १ चे विजेतेपद मिळवले होते.
Also Read : संगीत सम्राट देणार संगीताची आवड असलेल्या लोकांना संधी