सलमान खानच्या घरुन दररोज दाक्षिणात्य सुपरस्टार रामचरणला मिळतो जेवणाचा डब्बा; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 01:40 PM2022-01-07T13:40:00+5:302022-01-07T13:40:00+5:30

Ram charan: भाईजानच्या घरुन रामचरणसाठी जेवणाचा डब्बाही जातो. अलिकडेच एका मुलाखतीत रामचरण याने या गोष्टींचा खुलासा केला आहे.

telugu superstar ram charan talks about his upcoming film rrr and- salman khan | सलमान खानच्या घरुन दररोज दाक्षिणात्य सुपरस्टार रामचरणला मिळतो जेवणाचा डब्बा; कारण...

सलमान खानच्या घरुन दररोज दाक्षिणात्य सुपरस्टार रामचरणला मिळतो जेवणाचा डब्बा; कारण...

googlenewsNext

रामचरण (ramcharan) हे नाव कोणत्याही प्रेक्षकवर्गासाठी नवीन नाही. दाक्षिणात्य कलाविश्वासह बॉलिवूडमध्येही रामचरण हे नाव प्रसिद्ध आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी (chiranjeevi) यांचा लेक असलेल्या रामचरण याने 'जंजीर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यामुळे त्याचं बॉलिवूडसोबतही एक नातं तयार झालं आहे. विशेष म्हणजे त्याच्या आगामी RRR  या चित्रपटातही त्याच्यासोबत काही बॉलिवूड कलाकार स्क्रीन शेअर करणार आहेत.त्यामुळे रामचरण आणि बॉलिवूड कलाकारांचं चांगलं बॉण्डिंग निर्माण झाल्याचं दिसून येतंय. परंतु, बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान (salman khan) याच्यासोबत रामचरण यांची खास मैत्री आहे. विशेष म्हणजे अनेकदा भाईजानच्या घरुन रामचरणसाठी जेवणाचा डब्बाही जातो. अलिकडेच एका मुलाखतीत रामचरण याने या गोष्टींचा खुलासा केला आहे.

"मी, सलमान खानच्या खूप क्लोज आहे. कारण सलमान आणि माझ्या वडिलांनी थम्स अपच्या जाहिरातीमध्ये एकत्र काम केलं होतं. त्यावेळी मी त्यांना पहिल्यांदा भेटलो होतो. तेव्हापासून आजपर्यंत मी जेव्हा जेव्हा मुंबईत येतो त्यावेळी ते मला घरची आणि कुटुंबीयांची उणीव भासू देत नाहीत. मी मुंबईत कुठेही असलो तरीदेखील ते दररोज माझ्यासाठी लंच आणि डिनरसाठी जेवणाचा डब्बा पाठवतात", असं रामचरण म्हणाला.

1300 कोटींची प्रॉपर्टी असलेल्या दाक्षिणात्य सुपरस्टार रामचरणचं आलिशान घर पाहिलंय का?, पाहा Photos

पुढे तो म्हणतो, "फक्त माझ्यासाठीच नाही तर माझ्या सगळ्या क्रू मेंबर्ससाठीही ते जेवण पाठवतात. त्यांचं हे प्रेम मला पार भारावून टाकतं. एखाद्याची काळजी घेण्याची त्यांची पद्धतच वेगळी आहे. ते इतके मोठे अभिनेता असूनही खूप सहृदयी आहेत. निस्वार्थपणे ते एखाद्यासाठी करत असतात. त्यांच्यासारखं कोणीच नाहीये."

दरम्यान, सलमान आणि चिरंजीवी यांच्यात चांगली मैत्री आहे. त्यामुळेच चिरंजीवी यांचा लेक रामचरण मुंबईत आल्यानंतर सलमान त्याची काळजी घेतो. रामचरण याचा बहुप्रतिक्षीत ठरत असलेला RRR हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एस.एस. राजामौली दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण आणि आलिया भट्टदेखील स्क्रीन शेअर करणार आहेत. 

Web Title: telugu superstar ram charan talks about his upcoming film rrr and- salman khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.