VIDEO: 'आया रे सबका बापरे'; ठाकरे चित्रपटाचं म्युझिक लॉन्च

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 04:12 PM2019-01-12T16:12:26+5:302019-01-12T16:14:43+5:30

म्युझिक लॉन्चला उद्धव ठाकरे, नवाजुद्दीन सिद्दीकी उपस्थित

thackeray movie music launch event in mumbai | VIDEO: 'आया रे सबका बापरे'; ठाकरे चित्रपटाचं म्युझिक लॉन्च

VIDEO: 'आया रे सबका बापरे'; ठाकरे चित्रपटाचं म्युझिक लॉन्च

googlenewsNext

मुंबई: ठाकरे चित्रपटाचा म्युझिक लॉन्च सोहळा मुंबईत संपन्न झाला. यावेळी ठाकरे चित्रपटातील गाणी प्रदर्शित करण्यात आली. या सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी, अभिनेत्री अमृता राव, खासदार आणि निर्माते संजय राऊत उपस्थित होते. 

या म्युझिक लॉन्चमध्ये 'आया रे सबका बापरे, कहते है उसको ठाकरे...' हे हिंदी गाणं या सोहळ्यात लॉन्च करण्यात आलं. यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये या गाण्याला यूट्यूबवर लोकांची पसंती मिळताना दिसते आहे. नकाश अजीननं हे गाणं गायलं आहे. ते गाणं ऐकताना मला थोडं भान ठेवावं लागलं. कारण त्यावेळी मला गाण्यावर ठेका धरावासा वाटला होता, अशी गाण्याच्या मेकिंगची आठवण उद्धव यांनी लॉन्चवेळी सांगितली. 



ठाकरे चित्रपट सुरुवातीला सेन्सॉरमध्ये अडकला होता. मात्र त्यानंतर तो सेन्सॉरच्या कात्रीतून सुटला. हा चित्रपट पक्षाच्या प्रसारासाठी नसल्याचं खासदार आणि निर्माते संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. ठाकरे चित्रपट 25 जानेवारीला देशभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नवाझुद्दीन सिद्दीकीनं बाळासाहेबांची भूमिका साकारली आहे. तर अमृता राव मीनाताई ठाकरेंच्या भूमिकेत दिसणार आहे. 

Web Title: thackeray movie music launch event in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.