बाबुल सुप्रियो-रचना यांचा थाटात साखरपुडा
By Admin | Published: June 15, 2016 02:57 AM2016-06-15T02:57:56+5:302016-06-15T02:57:56+5:30
मोदी सरकारमधील केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी साखरपुडा केलाय. दिल्लीत राहणारी एअर होस्टेस रचना शर्मा हिच्यासोबत बाबुल यांचा साखरपुडा पार पडला. येत्या आॅगस्टमध्ये
मोदी सरकारमधील केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी साखरपुडा केलाय. दिल्लीत राहणारी एअर होस्टेस रचना शर्मा हिच्यासोबत बाबुल यांचा साखरपुडा पार पडला. येत्या आॅगस्टमध्ये बाबुल व रचना विवाहबंधनात अडकणार आहेत. सन २०१४ मध्ये कोलकाता ते मुंबई या विमान प्रवासात बाबुल यांची एअर होस्टेस रचनासोबत भेट झाली होती. काही मिनिटांच्या या भेटीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले.
येत्या ९ आॅगस्टला बाबुल व रचना यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे. लग्नानंतरचा पाच वर्षांचा प्लॅनही बाबुल यांनी तयार करून ठेवला आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, लग्नाचा पहिला वाढदिवस कोलकात्यात आणि पाचवा मुंबईत होईल.
योगायोग म्हणजे, २०१४मध्ये बाबुल यांना लोकसभेचे तिकीटही अशाच एका विमान प्रवासादरम्यान मिळाले होते. बाबा रामदेव यांच्यासोबत त्यांची विमानातच भेट झाली होती. बाबा रामदेव यांनीच बाबुल यांना राजकारणात आणले. बाबुल यांचा रचनासोबतचा हा दुसरा विवाह असेल. १९९५ मध्ये बाबुल यांचा रियासोबत विवाह झाला होता.
मात्र २००६ मध्ये त्यांच्यात घटस्फोट झाला. रिया व बाबुल यांची भेट शाहरूखच्या एका कार्यक्रमादरम्यान टोरंटोत झाली होती. त्यांची एक मुलगीही आहे. राजकारणात येण्यापूर्वी गायक असलेले बाबुल सुप्रियो यांचे ‘कहो ना प्यार है’ हे गाणे चांगलेच हिट झाले होते. याशिवायही त्यांनी अनेक हिट गाणी गायली आहेत.