जे आहे ते...; प्रशांत दामले यांनी संकर्षणच्या डायरीत लिहिला खास मेसेज, खूपच Inspiring!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 09:55 AM2023-07-19T09:55:27+5:302023-07-19T09:56:03+5:30

Sankarshan Karhade : अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्याला त्याच्या या प्रवासात आजवर बरीच कौतुकाची थाप मिळाली आहे.

That which is...; Prashant Damle wrote a special message in Sankarshan's diary, very inspiring! | जे आहे ते...; प्रशांत दामले यांनी संकर्षणच्या डायरीत लिहिला खास मेसेज, खूपच Inspiring!

जे आहे ते...; प्रशांत दामले यांनी संकर्षणच्या डायरीत लिहिला खास मेसेज, खूपच Inspiring!

googlenewsNext

परभणीचे नाव कलाविश्वात गाजवणारा अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade).  चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही क्षेत्रात त्याने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्याने 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshingath), 'खुलता कळी खुलेना' (Khulta Kali Khulena) या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच 'वेडिंगचा शिनेमा' या चित्रपटात तो महत्त्वाच्या भूमिकेत होता. 'महाराष्ट्राची किचन क्वीन' (Maharashtrachi Kitchen Queen)हा त्याचा कुकिंग शो सुरु आहे. त्याला त्याच्या या प्रवासात आजवर बरीच कौतुकाची थाप मिळाली आहे. याबाबत त्याने नुकतेच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. त्यातील प्रशांत दामलें(Prashant Damle)नी संकर्षणच्या डायरीत लिहिलेला मेसेज खूप खास होता. 

संकर्षण कऱ्हाडे म्हणाला की, मी गेली पाच-सहा वर्ष २०१५-१६ पासून दरवर्षी माझ्या डायरीच्या पहिल्या पानावर दोन लोकांची सही घेतो. त्यातले एक व्यक्ती म्हणजे माझे बाबा आणि दुसरे प्रशांत दामले. दरवर्षी प्रशांत दामले मला सहीसोबत एक शेरादेखील देतात. पहिल्या वर्षी त्यांनी कष्ट कर असा शेरा दिला होता. दुसऱ्या वर्षी आणखी काही दिले. तिसऱ्या वर्षी त्यांनी आयुष्यात शब्द आणि सूर फार महत्त्वाचे असतात असे लिहिले. मागच्या वर्षी मालिका, नाटक छान झाली. यावर्षी त्यांनी जानेवारीत माझ्या डायरीच्या पहिल्या पानावर लिहिले की, जे आहे ते राख, नाही ते मिळव. दामलेंचं हेच सूत्र आहे कमी शब्दात खूप मेसेज देणे. या मेसेजमधून त्यांनी मला कौतुकासोबत जबाबदारीची जाणीव करुन दिली आहे. या सगळ्यामध्ये हे सगळे आले. 

असे कौतुकही बरं वाटतात...

कौतुक म्हणजे सगळ्यांनी येऊन सांगायला पाहिजे असे काही नाही. आई -बाबांना जेव्हा बरं वाटतं तेव्हा ते कौतुकही बरं वाटतं. किचन क्वीनच्या सेटवर सत्तर-पंचेहत्तरच्या आजीबाई आल्या होत्या. त्यांनी मला तुमची दृष्ट काढावाशी वाटतेय. काढू का म्हटलं. हे असंही कौतुक मिळते. नाटकाच्या प्रयोगावेळी एक ताई भेटल्या होत्या. त्यांनी माझ्यावर कविता केली होती. त्यात माझे गुणगान केले होते. असे कौतुक फार बरे वाटतात, असे संकर्षण म्हणाला.

वर्कफ्रंट... 

२००८ साली महाराष्ट्राचा सुपरस्टार या झी मराठीच्या कार्यक्रमात संकर्षण झळकला होता. त्याने ‘आभास हा’, ‘मला सासू हवी’, ‘देवा शप्पथ’, ‘खुलता कळी खुलेना’, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकांमधून रसिकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. त्याबरोबरच संकर्षण नाटकांमध्येही काम करत आहे. त्याने लिहिलेले तू म्हणशील तसं हे नाटक यशस्वी ठरले. तसेच आता संकर्षण कऱ्हाडेने प्रशांत दामलेंची निर्मिती असलेलं नियम अटी लागू या नवीन नाटकाचे लेखन केले असून यात तो भूमिकाही साकारत आहे.

Web Title: That which is...; Prashant Damle wrote a special message in Sankarshan's diary, very inspiring!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.