स्टार प्रवाह वाहिनीवरील ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, खुद्द अभिनेत्रीनेच दिली हिंट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 06:57 PM2023-04-27T18:57:19+5:302023-04-27T18:57:45+5:30

Star Pravah :स्टार प्रवाह वाहिनीच्या इन्स्टाग्रामवर नुकताच नव्या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. यात अभिनेत्री दिव्या पुगावकर ही मुख्य भूमिकेत दिसत आहे.

The actress herself gave a hint that the audience will take leave of this series on Star Pravah channel | स्टार प्रवाह वाहिनीवरील ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, खुद्द अभिनेत्रीनेच दिली हिंट

स्टार प्रवाह वाहिनीवरील ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, खुद्द अभिनेत्रीनेच दिली हिंट

googlenewsNext

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील एक मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे बोलले जात आहे. ही मालिका म्हणजे स्वाभिमान (Swabhiman). त्या जागी लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मन धागा धागा जोडते नवा’ (Man Dhaga Dhaga Jodte Nava) असे या मालिकेचे नाव आहे. नुकतंच या मालिकेचा प्रोमोही समोर आला आहे.

स्टार प्रवाह वाहिनीच्या इन्स्टाग्रामवर नुकताच नव्या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. यात अभिनेत्री दिव्या पुगावकर ही मुख्य भूमिकेत दिसत आहे. ‘लग्न झालं की मुलीचा माहेरशी असलेला संबंध खरंच संपतो..?’ अशा आशयाची ही मालिका असणार आहे. येत्या ८ मे पासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

तर स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘स्वाभिमान: शोध अस्तित्वाचा’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. नुकतेच या मालिकेतील अभिनेत्री पूजा बिरारी हिने पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने स्वत:चा फोटो शेअर करत ‘बिईंग पल्लवी’ असे म्हणतं आभार मानले आहेत. नुकतंच या मालिकेचा शेवटच्या भागाचे शूटींग करण्यात आले.

दरम्यान ‘स्वाभिमान: शोध अस्तित्वाचा’ ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर संध्याकाळी ६.३० वाजता प्रसारित व्हायची. मात्र या मालिकेच्या जागी आता ‘मन धागा धागा जोडते नवा’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या मालिकेसाठी जुन्या मालिकेचे कथानक पटापट पुढे ढकलले जात असल्याचा आरोप प्रेक्षकांकडून केला जात आहे.

Web Title: The actress herself gave a hint that the audience will take leave of this series on Star Pravah channel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.