'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतून या अभिनेत्रीनं घेतला ब्रेक?, समोर आलं मोठं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 08:17 PM2022-06-21T20:17:35+5:302022-06-21T20:18:09+5:30

'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asata)ला अल्पावधीत चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.

The actress took a break from the series 'Sukh Mhanje Nakki Kay Asata' | 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतून या अभिनेत्रीनं घेतला ब्रेक?, समोर आलं मोठं कारण

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतून या अभिनेत्रीनं घेतला ब्रेक?, समोर आलं मोठं कारण

googlenewsNext

स्टार प्रवाह वाहिनवरील मालिका 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asata)ला अल्पावधीत चांगलीच लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील गौरी आणि जयदीपची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावते आहे. तसेच या मालिकेतील इतर पात्रांनाही रसिकांची खूप पसंती मिळताना दिसते. दरम्यान या मालिकेत माईंची भूमिका अभिनेत्री वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) साकारत आहेत. त्यांनी माईंच्या भूमिकेतून रसिकांच्या मनात घर केले आहे.
या मालिकेतून वर्षा उसगावकर यांनी ब्रेक घेतल्याचे समजते आहे.

गेल्या काही दिवसांपासून वर्षा उसगावकर यांनी मालिका सोडल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. मात्र या वृत्तात अजिबात तथ्य नाही. वर्षा उसगावकर सध्या ‘सारखं काहीतरी होतय’ या नाटकामध्ये काम करत आहेत. संकर्षण कऱ्हाडेने या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे, तर प्रशांत दामले यांनी या नाटकांमध्ये मुख्य भूमिका केली आहे. आता या नाटकाचा प्रयोग लंडन येथे होणार आहे. काही दिवसांपूर्वी प्रशांत दामले यांनी या नाटकाबाबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये सगळे कलाकार लंडनमधील गार्डन बाहेर उभे असलेली दिसत आहेत. 


प्रशांत दामले यांनी सांगितले की, शंभर वर्ष जुने असलेल्या नाट्यगृहात आमच्या ‘सारखं काहीतरी होतय’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे. या नाटकाच्या प्रयोगासाठी वर्षा उसगावकर आता लंडनला गेल्या आहेत.


वर्षा उसगावकर यांनी सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतून काही काळ ब्रेक घेतला आहे. त्यांनी मालिकेच्या काही भागांचे चित्रीकरण आधीच केले आहे. त्यामुळे लंडनमधील नाटकाचा प्रयोग पार पडल्यानंतर त्या पुन्हा शूटिंगला सुरूवात करतील.

Web Title: The actress took a break from the series 'Sukh Mhanje Nakki Kay Asata'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.