प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अडकणार लग्नबेडीत, लग्नाच्या जय्यत तयारीचे फोटो आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 02:55 PM2024-03-23T14:55:06+5:302024-03-23T14:55:39+5:30
गौतमी देशपांडे-स्वानंद तेंडुलकर, अभिनेता ऋषी मनोहर-तन्मई पेंडसे, अभिनेता सिद्धार्थ बोडके- अभिनेत्री तितिक्षा तावडे यांनी लग्नगाठ बांधली. तसेच अभिनेत्री पूजा सावंतनेही नुकतेच लग्न केले. दरम्यान आता आणखी एक अभिनेत्री लवकरच लग्नगाठ बांधणार आहे.
मराठी सिनेइंडस्ट्रीत मागील वर्षांपासून नवीन वर्षातही लग्नसराई पाहायला मिळत आहे. गौतमी देशपांडे-स्वानंद तेंडुलकर, अभिनेता ऋषी मनोहर-तन्मई पेंडसे, अभिनेता सिद्धार्थ बोडके- अभिनेत्री तितिक्षा तावडे यांनी लग्नगाठ बांधली. तसेच अभिनेत्री पूजा सावंतनेही नुकतेच लग्न केले. दरम्यान आता आणखी एक अभिनेत्री लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. तिच्या घरात लग्नाची जय्यत तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. ही अभिनेत्री म्हणजे माझे मन तुझे झाले फेम अभिनेत्री स्वरदा ठिगळे (Swarda Thigale).
स्वरदा ठिगळेचा जानेवारी महिन्यात साखरपुडा सिद्धार्थ राऊतसोबत पार पडला होता. तिने सोशल मीडियावर व्हिडीओ आणि फोटो शेअर करत ही खुशखबर दिली होती. त्यानंतर आता ती लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. तिच्या घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. तिने इंस्टाग्राम स्टोरीवर व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओत घरातल्या महिला मंडळी फुलांच्या माळा बनवत आहेत. त्यानंतर स्वरदा आई आणि सासूसोबत नेल आर्ट करण्यासाठी गेली होती. याशिवाय तिने एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती हिरव्या साडीत दिसते आहे आणि घरातील दिवंगत सदस्यांच्या फोटोंच्या पाया पडताना दिसत आहे.
स्वरदाचा होणारा नवरा सिद्धार्थ राऊत हा डिझायनर आहे. त्या दोघांच्या लग्नाच्या तारखेबद्दल अद्याप काही समजू शकलेले नाही. मात्र फोटोंवरून ते लवकरच लग्नगाठ बांधतील, याचा अंदाज येतो.
वर्कफ्रंट..
स्वरदा ठिगळे हिने तिच्या करियरची सुरूवात मराठी कलाविश्वातून केली आहे. २०१३ साली तिने माझे मन तुझे झाले या मराठी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. या मालिकेत तिने शुभ्राची भूमिका केली होती. ही भूमिका खूप लोकप्रिय झाली होती. तसेच २०१७ साली तिने सावित्री देवी कॉलेज या हिंदी मालिकेत काम केले होते. याशिवाय ती स्टार भारत वाहिनीवरील ‘प्यार के पापड’ मालिकेत झळकली होती. शेवटची ती ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकली होती.