जगभरात 1000 हून अधिक भाषांमध्ये डब झालाय हा चित्रपट, इस्रारायलमध्ये शूटिंग; जाणून घ्या काय आहे खास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 10:59 AM2022-12-15T10:59:07+5:302022-12-15T11:01:20+5:30
सांगण्यात येते, की जिझस चित्रपट हा आतापर्यंतचा सर्वाधिक वेळा पाहिला गेलेला मोशन चित्रपट आहे. एवढेच नाही, तर हा आतापर्यंतचा सर्वाधिक वेळा ट्रान्सलेट झालेला चित्रपटही आहे. हा चित्रपट तब्बल एक हजाराहून अधिक वेळा ट्रान्सलेट करण्यात आला आहे.
खरे तर, सिनेसृष्टी हा एक अथांग समुद्र आहे. या समुद्रात जेवढे खोल जाल, तेवढेच आपल्याला काही तरी नवे सापडेल. जे मनोरंजक तर असेलच, शिवाय धक्कादायकही असेल. आज आम्ही आपल्यासाठी अशाच एका हॉलिवूड चित्रपटासंदर्भात माहिती घेऊन आलो आहोत. हा चित्रपट 43 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला असून सर्वाधिक वेळा अनुवादितही झाला आहे. हा चित्रपट एक हजाराहून अधिक वेळा डब करण्यात आला आहे. या चित्रपटाचे नाव आहे 'द जीझस फिल्म'.
कया आहे चित्रपटात -
'जीसस' हा चित्रपट 'द जीसस फिल्म' नावानेही ओळखला जातो. 1979 मध्ये रिलीज झालेला हा अमेरिकन, बायबल ड्रामा चित्रपट पीटर सायक्स आणि जॉन कृष यांनी डायरेक्ट तर जॉन हेमॅनने प्रोड्यूस केला होता. या चित्रपटात प्रामुख्याने येशू ख्रिस्ताची स्टोरी दाखवण्यात आली होती. संर्व पात्र आणि घटनांच्या बॅकग्राउंडची माहिती देत संपूर्ण चित्रपटात एक व्हॉइस ओव्हर नॅरेशन दाखवण्यात आला आहे.
इस्रारायलमध्ये शूटिंग, 6 मिलियन डॉलर एवढे बजेट -
हा चित्रपट इस्रायलमध्ये शूट करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट त्या काळात 6 मिलियन डॉलर्सच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. विशेष म्हणजे, हा चित्रपट प्रोडक्शन शिवाय आणि कास्ट क्रेडिट शिवाय रिलीज करण्यात आला होता. कारण, प्रोड्यूसर जॉन हेमॅन यांनी, या चित्रपटाचे निर्माते केवळ ट्रान्सलेटर्स आहेत, अशी घोषणा केली होती. चित्रपची निर्मिती आणि दिग्दर्शन कुणी केले हे समजू नये, असा या मागचा उद्देश होता. या चित्रपटाच्या शेवटी सांगण्यात आले आहे, की शुटिंगदरम्यान गुड न्यूज बायबलचा (आजचे इंग्लिश व्हर्जन) वापर करण्यात आला होता. यात समांतर कथा सांगण्याऐवजी, इतर बायबल चित्रपटांप्रमाणेच दाखवण्यात आली होती.
सर्वाधिक वेळा ट्रान्सलेट -
सांगण्यात येते, की जिझस चित्रपट हा आतापर्यंतचा सर्वाधिक वेळा पाहिला गेलेला मोशन चित्रपट आहे. एवढेच नाही, तर हा आतापर्यंतचा सर्वाधिक वेळा ट्रान्सलेट झालेला चित्रपटही आहे. हा चित्रपट तब्बल एक हजाराहून अधिक वेळा ट्रान्सलेट करण्यात आला आहे.