'काश्मीर फाईल्स'नंतर आता विवेक अग्निहोत्री आणणार 'The Delhi Files'; पडद्यावर दिसणार दंगलीच्या वेदना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 09:20 AM2022-03-26T09:20:55+5:302022-03-26T09:21:59+5:30
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा काश्मीर फाईल्स हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. अशातच आता ते लवकरच दिल्लीतील दंगलीवर आधारित चित्रपट 'द डेल्ही फाईल्स' आणण्याच्या तयारीत आहेत.
सध्या दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा चित्रपट खूप चर्चेत आहे. काश्मीर फाइल्स या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर (Box Office) रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. हा चित्रपटावरून दोन भिन्न मतप्रवाह तयार झाले आहेत. काही जणांनी या चित्रपटाचं समर्थन केलं आहे, तर काही जणांची या चित्रपटाचा विरोधही केला आहे. यापूर्वी विवेक अग्नीहोत्री यांच्या 'ताश्कंद फाईल्स'वरूनही वाद निर्माण झाला होता. परंतु आता विवेक अग्निहोत्री लवकरच दिल्ली दंगलीवरील चित्रपट घेऊन येणार आहेत.
सध्या विवेक अग्निहोत्री दे दिल्लीत झालेल्या दंगलीवर आधारित 'द डेल्ही फाईल्स' (The Delhi Files) हा चित्रपट तयार करत आहेत. यापूर्वी १३ सप्टेंबर २०२१ रोजीच विवेक अग्निहोत्री यांनी 'द डेल्ही फाईल्स' या चित्रपटाची घोषणा केली होती. तसंच त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याचा पोस्टरही शेअर केला होता. हा चित्रपट हिंदी आणि पंजाबी या दोन भाषांमध्ये येणार असल्याचंही सांगण्यात आलं होतं. याशिवाय अभिषेक अग्रवाल, अर्चना अग्रवाल, विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी या चित्रपटाचे दिग्दर्शक असल्याचं समोर आलं होतं. काश्मीर फाईल्स हा चित्रपट हा न्यायाचा अधिकार तर डेल्ही फाईल्स हा चित्रपट जगण्याच्या अधिकाराबद्दल असल्याचं यात सांगण्यात आलं होतं.
Few years back, I started telling untold stories of independent India.
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) September 13, 2021
1. #TheTashkentFiles - Right To Truth.
2. #TheKashmirFiles - Right To Justice (releasing soon)
Happy to announce the last & the boldest of the trilogy:
3. #TheDelhiFiles - Right To Life.
Pl bless us. pic.twitter.com/gBJtX4ilZR
'द काश्मीर फाईल्स' २०० कोटींपार
विवेक अग्निहोत्रीच्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करून इतिहास रचला आहे. या चित्रपटानं १३ व्या दिवशी २०० कोटींचा गल्ला जमवला. हा चित्रपट जवळपास २० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. ११ मार्च रोजी हा चित्रपट ७०० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला होता, मात्र प्रेक्षकांमध्ये असलेली जबरदस्त क्रेझ पाहता पहिल्या वीकेंडमध्ये तो २००० स्क्रीन्सवर वाढवण्यात आला आणि दुसऱ्या वीकेंडपासून तो ४००० स्क्रीन्सवर दाखवला जात आहे.