IMDb वर 'The Kashmir Files'चं रेटिंग झालं कमी; विवेक अग्निहोत्री म्हणाले, "हे अनएथिकल आणि..."
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 01:18 PM2022-03-16T13:18:09+5:302022-03-16T13:18:32+5:30
'The Kashmir Files' Vivek Agnihotri : अनेकदा लोक चित्रपट पाहायला जाण्यापूर्वी IMDb वर त्याचं रेटिंग पाहतात. या रेटिंगवरून फिल्म कशी आहे याची कल्पना येते.
'The Kashmir Files' Vivek Agnihotri : द काश्मीर फाईल्स या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर (Box Office) जबरदस्त कमाई केली आहे. पब्लिक आणि क्रिटिक्स दोन्हीकडून या चित्रपटाला चांगला रिस्पॉन्स मिळतो. अनेकांनी या चित्रपटात मांडलेल्या विषयाचं आणि चित्रपटाच्या मांडणीचंही कौतुक केलंय. ऑडियन्स वोटिंगच्या आधारावरच या चित्रपटाला 9.9/10 IMDb रेटिंग मिळालं होतं. परंतु काही दिवसांनी हे रेटिंग कमी झालं. यावर चित्रपटाते दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
काश्मीर फाईल्स या चित्रपटाला IMDb वर 9.9/10 इतकं रेटिंग देण्यात आलं होतं. परंतु यानंतर रेटिंग सिस्टममध्ये बदल करण्यात आला आणि आता या चित्रपटाला 8.3/10 इतकं रेटिंग देण्यात आलं. आमच्या रेटिंग यंत्रणेला या शीर्षकावर संशयास्पद क्रियाकलाप आढळला आहे. आमच्या रेटिंग सिस्टमचा प्रामाणिकपणा काय राखण्यासाठी आम्ही आणखी एक निकष लागू केला आहे, असं काश्मीर फाईल्सच्या IMDb पेजवर लिहिण्यात आलंय.
THIS IS UNUSUAL AND UNETHICAL. https://t.co/Iwcc7yQCGk
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) March 14, 2022
दिग्दर्शकांकडून नाराजी
या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी या बदललेल्या रेटिंगवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी एक ट्वीट करत आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. "हे असामान्य आणि अनएथिकल आहे," असं ट्वीट त्यांनी केलंय. चित्रपटासाठी IMDb रेटिंग किती महत्त्वाची आहे याची सर्वांनाच कल्पना आहे. अशातच हे कमी झालेलं रेटिंग व्हुअरशीपलादेखील प्रभावीत करू शकतं अशा चर्चा सध्या सुरू झाल्या आहेत.