The kashmir files चित्रपटाच्या वादावर अखेर नादव लॅपिड यांनी मागितली माफी, म्हणाले- पीडित कुटुंबीयांचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 04:08 PM2022-12-01T16:08:13+5:302022-12-01T16:14:44+5:30
द काश्मीर फाइल्स’ हा प्रपोगंडा व वल्गर चित्रपट आहे, असं नादव यांनी म्हटलं होते. यानंतर देशात नव्या वादाला तोंड फुटले होते.
Nadav Lapid Apologies For His Comment:गोव्यात नुकत्याच पार पडलेल्या इफ्फी या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे ज्युरी हेड नादव लॅपिड (Nadav Lapid) यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाबद्दल वक्तव्य केलं आणि देशभरातलं वातावरण तापलं. ‘द काश्मीर फाइल्स’ हा प्रपोगंडा व वल्गर चित्रपट आहे, असं नादव यांनी म्हटलं आणि नादव लॅपिड हे नाव अचानक चर्चेत आलं होते. यानंतर बराच गदारोळ झाला. काहींना त्यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं तर काहींना कडाडून विरोध केला. मात्र आता वादात सापडलेल्या नादव लॅपिड यांना माफी मागितली आहे.
22 नोव्हेंबर रोजी गोव्यात आयोजित IFFI 2022 च्या समारोप समारंभात नादव यांनी 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटावर भाष्य केले. यानंतर वाद वाढला. लॅपिड यांच्या भाषणाने देशात नव्या वादाला तोंड फुटले. सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री आणि अनुपम खेर यांनी लॅपिडवर टीका केली. तर अभिनेत्री स्वरा भास्करने लॅपिड यांची बाजू घेतली.
''कुणाचा अपमान करण्याचा हेतू नव्हता''
आता लॅपिड यांचा सूर बदलेला दिसतोय. CNN-News18 शी दिलेल्या मुलाखतीत बोलताना ते म्हणाले, मला कुणाचा ही अपमान करण्याचा नव्हता. पीडित किंवा त्यांच्या नातेवाईकांचा अपमान करण्याचा माझा कधीच हेतू नव्हता. मी माफी मागतो."
इस्राइलचे राजदूत नाओर गिलोन केली होती कानउघडणी
इस्राइलचे राजदूत नाओर गिलोन यांनी याआधी लॅपिड यांची कानउघडणी केली होती.या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले होते की, भारत आणि इस्राइल हे दोन देश आणि या देशांमधील लोकांमधील मैत्री खूप मजबूत आहे. नदव लापिड तुम्ही जे नुकसान केले आहे. ते भरून येईल. मात्र एक व्यक्ती म्हणून मला लाज वाटते. तसेच मी आम्ही आमच्या यजमान देशाची त्या वर्तनासाठी माफी मागतो. त्यांचं औदार्य आणि मैत्रीची परतफेड आम्ही अशी केलीय.