सर्वात मोठा फ्लॉप! ४५ कोटींमध्ये बनलेल्या 'या' सिनेमाने कमावले होते फक्त ३७ हजार ६७० रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 15:14 IST2025-02-24T15:13:22+5:302025-02-24T15:14:14+5:30

का झाला हा सिनेमा सुपरफ्लॉप?

the lady killer is biggest flop movie in hindi film history box office collection was only 38 thousand rupees | सर्वात मोठा फ्लॉप! ४५ कोटींमध्ये बनलेल्या 'या' सिनेमाने कमावले होते फक्त ३७ हजार ६७० रुपये

सर्वात मोठा फ्लॉप! ४५ कोटींमध्ये बनलेल्या 'या' सिनेमाने कमावले होते फक्त ३७ हजार ६७० रुपये

मनोरंजनसृष्टीत एखादा सिनेमा फ्लॉप झालाच तरी काही लाख तरी कमावतोच. तसंच सिनेमा बनवायला म्हटलं की किमान १०-२० कोटींचा तर खर्च होतोच. पण तुम्हाला माहितीये का ४५ कोटींमध्ये बनलेला असा एक सिनेमा आहे ज्याने देशात जेमतेम ३७ हजार रुपयेच कमावले. हो फक्त ३७ हजार ६७० रुपये एवढी सिनेमाची कमाई होती. कोणता आहे तो सिनेमा?

बॉक्सऑफिसवर सिनेमाची कमाई किती झाली यावर सिनेमाचं यश ठरतं. आजकाल ४००-५०० कोटींचा गल्ला जमवणारे सिनेमे येत आहेत. पण ३ नोव्हेंबर २०२३ मध्ये एक सिनेमा आला होता जो सुपरफ्लॉप झाला होता. तो सिनेमा आहे 'द लेडी किलर' (The Lady Killer). यामध्ये अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) मुख्य भूमिकेत होते. हा आातपर्यंतचा सुपरफ्लॉप चित्रपट आहे. सिनेमा बनवण्यासाठी तब्बल ४५ कोटी खर्च झाले होते. तर याची एकूण कमाई ३७,६७० रुपयेच होती. तर जगभरात सिनेमाने ७० हजारांचा बिझनेस केला. 

'द लेडी किलर' सिनेमात अर्जुन कपूरने राजेंद्र जोशीची भूमिका साकारली होती. तर भूमी जेन्सी बर्मन या भूमिकेत होती. प्रेम, द्वेष, अनैतिक संबंधांवर या सिनेमाची कथा आधारित होती. भारतीय हिंदी सिनेमाच्या इतिहासातला हा सर्वात अपयशी ठरलेला सिनेमा आहे. 'द लेडी किलर'चं दिग्दर्शन अजय बहल यांनी केलं होतं. त्यांनी याआधी 'ब्लर','सेक्शन 375','बीए पास' सारखे सिनेमेही दिग्दर्शित केले होते. सिनेमाचं वितरण रवीना टंडनचे पती अनिल थडानींनी केलं होतं. सिनेमाच्या कथेतच फारसा दम नव्हता म्हणून तो आपटला.  

Web Title: the lady killer is biggest flop movie in hindi film history box office collection was only 38 thousand rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.