प्रेग्नंसीच्या 8 व्या महिन्यात मराठी अभिनेत्रीला सोडावं लागलेलं घर; जुन्या आठवणींमुळे झाली भावुक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 11:45 AM2023-10-29T11:45:42+5:302023-10-29T11:46:16+5:30
Samidha guru: समिधाने तिच्या खासगी आयुष्यातील स्ट्रगलविषयी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
मराठी कलाविश्वातील बऱ्याच अशा अभिनेत्री आहेत ज्या सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत असतात. त्यातलंच एक नाव म्हणजे समिधा गुरु (samidha guru). अनेक गाजलेल्या मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली समिधा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती सातत्याने चर्चेत येत असते. बऱ्याचदा उत्तम अभिनयामुळे चर्चेत येणारी समिधा सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत आहे. अलिकडेच तिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने प्रेग्नंट असताना तिला राहतं घर सोडावं लागलं होतं, असा खुलासा केला आहे. तिच्या या वक्तव्यानंतर अनेकांच्या नजरा तिच्याकडे वळल्या आहेत.
समिधाने नुकतीच its.majja ला मुलाखत दिली. यावेळी 'घराची गोष्ट' या सेगमेंटमध्ये बोलत असताना तिने तिच्या प्रेग्नंसी काळातील काही आठवणी शेअर केल्या. यात प्रेग्नंट असताना तिला घर सोडावं लागलं होतं. तो काळ तिच्यासाठी ट्रिगर पॉईंट होता आणि याच घटनेमुळे तिने आणि तिच्या नवऱ्याने अभिनेता अभिजीत गुरु याने अथक मेहनत, परिश्रम करुन मुंबईत हक्काचं घर खरेदी केलं.
माझ्या नवऱ्याची बायको: KD ची पत्नीदेखील आहे लोकप्रिय अभिनेत्री; Photo पाहून व्हाल थक्क
"आम्ही गोरेगावला भाड्याने राहत होतो. त्यावेळी मी ८ महिन्यांची प्रेग्नंट होते. काही कारणामुळे आम्हाला ते घर सोडावं लागलं. तो ट्रिगर पॉईंट होता माझ्यासाठी आणि अभिजीतसाठी. कारण, मी प्रेग्नंट आहे आणि त्या अवस्थेत घर शोधणं, ते शिफ्ट करणं. आमचे मित्र-मैत्रिणी, नातेवाईक होते सोबत पण, मानसिकरित्या जो ताण असतो तो वेगळाच असतो. त्यावेळी अभिजीतने ठरवलं की मुंबईत स्वत:चं घर घ्यायचं. कुटुंब खूप महत्त्वाचं असतं. प्रत्येक वेळी आपल्याला पैशांचीच गरज असते असं नाही. पण, काही वेळा असं कोणीतरी हवं असतं जे सांगतात हा हे कर. तो पाठिंबा हवा असतो. घर घेताना सुद्धा आधी आम्ही पैसे जमा केले मग उडी मारली", असं समिधाने सांगितलं.
दरम्यान, समिधा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अभिनेत्री असण्यासोबतच ती एक उत्तम गृहिणीदेखील आहे. बऱ्याचदा ती सोशल मीडियावर तिचे रेसिपीचे व्हिडीओ शेअर करत असते. तर, काही वेळा तिच्या लेकीसोबत दुर्वासोबतचे रिल्सही शेअर करताना दिसते.