'लाखात एक आमचा दादा' मालिकेत दिशा परदेशी साकारणार ही भूमिका, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 02:49 PM2024-07-08T14:49:50+5:302024-07-08T14:50:12+5:30

'लाखात एक आमचा दादा' (Lakhat Ek Amcha Dada) मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत नितेश चव्हाण मुख्य भूमिकेत आहे. तसेच या मालिकेतून अभिनेत्री दिशा परदेशी पाहायला मिळणार आहे.

The role that Disha Pardeshi will play in the serial 'Lakhat Ek Amacha Dada', said... | 'लाखात एक आमचा दादा' मालिकेत दिशा परदेशी साकारणार ही भूमिका, म्हणाली...

'लाखात एक आमचा दादा' मालिकेत दिशा परदेशी साकारणार ही भूमिका, म्हणाली...

'लाखात एक आमचा दादा' (Lakhat Ek Amcha Dada) मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत नितेश चव्हाण मुख्य भूमिकेत आहे. तसेच या मालिकेतून अभिनेत्री दिशा परदेशी पाहायला मिळणार आहे. तिने तुळजा ही व्यक्तिरेखा साकारली आहे. नुकतेच तिने या भूमिकेबद्दल सांगितले. 

दिशा परदेशी म्हणाली की, "तुळजा एक सुंदर, सुशील डॉक्टर आहे, स्वभावाने प्रामाणिक आणि अभ्यासात अतिशय हुशार आहे. इतर मुलींना ही अभ्यासासाठी प्रोत्साहित करते. तिला वाटतं की मुलगी शिकली तरच तिची प्रगती होईल आणि ती स्वतःच अस्तित्व ह्या जगात निर्माण करू शकेल. ती नम्र, सर्वांचा आदर करणारी आणि  समजूतदार आहे पण गरज पडली तर आरे ला कारे करणारी आहे. तुळजा श्रीमंत घरातली मुलगी आहे. तुळजाच्या घरात तिचे बाबा, मोठा भाऊ , लहान भाऊ आहेत सगळ्यात वेगळी गोष्ट म्हणजे तिच्या दोन आई आहेत. तिचे बाबा आणि मोठा भाऊ कडक शिस्तीचे आहेत. तुळजा लहानपणापासून अभ्यासात चांगली असल्याकारणाने घरच्यांनीच निर्णय घेतला की तिला डॉक्टर बनवायचं म्हणून तिला गावाबाहेर पुणे शहरात एम.बी.बी.एसची तयारी करायला पाठवतात. 

आणि तो कौलं होता वज्र प्रॉडक्शनमधून

तिने पुढे म्हटले की, ही भूमिका माझ्यापर्यंत येण्याचा किस्सा सांगायला आवडेल मला. मागच्या वर्षी मी माझ्या एका मराठी चित्रपटाच्या शूटिंगसाठी स्कॉटलंडला गेले होते. त्याचे नाव होते ‘मुसाफिरा’ चित्रपटाचे प्रोमोशन चालू झाले, चित्रपट प्रदर्शित झाला आणि मला एके दिवशी कॉल आला. कॉलवर विचारले गेले की तुम्ही दिशा परदेशी बोलताय का आणि ‘मुसाफिरा’ चित्रपटात तुम्हीच काम केलं आहे ना आणि तो कौलं होता वज्र प्रॉडक्शन मधून. त्यांनी सांगितले की  त्यांची नवीन मालिका येत आहे जी झी मराठीवर प्रसारित होणार आहे. आम्ही मालिकेच्या हिरोईनसाठी तुमचा विचार करत आहोत आणि आम्हाला खात्री आहे की तुम्ही त्या भूमिकेसाठी योग्य आहात. मला ही गोष्ट आणि माझी भूमिका  ऐकून खूप वेगळी वाटली आणि असा सुरु झाला तुळजाचा प्रवास. 

नितीश आणि माझी खूप छान मैत्री आहे

मला आनंद आहे की झी मराठी सारख्या इतक्या मोठ्या वाहिनीसोबत मी काम करत आहे आणि त्यांच्या माध्यमातून मी घराघरात पोहचणार आहे. नितीश आणि माझी खूप छान मैत्री आहे. मालिकेत आमचं एक गोड नातं आहे आणि तुम्हाला ही ते स्क्रीनवर पाहायला मज्जा येईल. नितीश उत्तम कलाकार आहे. आमची छान मैत्री असल्यामुळे एकदम मज्जेत सीन्स शूट होतात. सहकलाकारांसोबत सुद्धा छान ट्युनिंग जमलं आहे. मला खासगी आयुष्यात  कोणीही दादा नाही  कारण मी माझ्या आई-बाबांची एकुलती एक मुलगी आहे. पण मला चुलत भावंडे आहेत आणि त्यांच्यासोबत माझं नातं खूप प्रेमाचं आहे. मला इथे आवर्जून सांगायला आवडेल की  'लाखात एक आमचा दादा' मध्ये जो माझ्या मोठ्या भावाची भूमिका साकारत आहे ज्याचे नाव आहे शत्रू. शत्रू आणि तुळजाच मालिकेत कडवट नातं आहे पण खऱ्या आयुष्यात माझं आणि त्याच नातं एका मोठ्या भावा आणि लहान बहिणी सारखं आहे. आमची छान मैत्री ही आहे तो माझी एक लहान बहिणी सारखी ऑफस्क्रीन काळजी घेतो, असे तिने सांगितले.

आणि अभिनयाकडे कल वाढत गेला

अभिनय क्षेत्रात येऊन तीन- साडेतीन वर्ष झाली. त्या आधी मी एक शास्त्रीय नृत्यांगना होते आणि ह्या ही आधी मी तब्बल १० वर्ष मॉडेलिंग केलं आहे. हळूहळू मॉडेलिंग सुटत गेले आणि अभिनयाकडे कल वाढत गेला. मी शेवटी हेच म्हणेन की  'लाखात एक आमचा दादा' आणि तुळजावर तुमचा आशिर्वाद राहू दे, असेही तिने यावेळी म्हटले.

Web Title: The role that Disha Pardeshi will play in the serial 'Lakhat Ek Amacha Dada', said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.