आरआरआर खतरनाक ! राम चरण आणि Jr NTRच्या RRR चा सिक्वल येणार, राजामौली स्पष्टच म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 01:00 PM2022-04-07T13:00:39+5:302022-04-07T13:14:41+5:30

नुकताच रिलीज झालेला 'RRR' या चित्रपटाने जवळपास 1000 कोटींचा गल्ला जमवला आहे. यानंतर यासिनेमाचा सिक्वल येणार का अशी चर्चा सुरु झालीय.

The sequel of Ram Charan and Jr NTR's RRR will come, Rajamouli said | आरआरआर खतरनाक ! राम चरण आणि Jr NTRच्या RRR चा सिक्वल येणार, राजामौली स्पष्टच म्हणाले....

आरआरआर खतरनाक ! राम चरण आणि Jr NTRच्या RRR चा सिक्वल येणार, राजामौली स्पष्टच म्हणाले....

googlenewsNext

साउथ स्टार राम चरण (Ram charan) आणि ज्युनियर एनटीआर (Jr NTR)यांची जोडी इंडस्ट्रीतील हिट जोडींपैकी एक बनली आहे.  नुकताच प्रदर्शित झालेला 'RRR' या चित्रपटाने जवळपास 1000 कोटींचा गल्ला जमवला आहे. एसएस राजामौली यांनी बुधवारी सक्सेस पार्टीचे आयोजन केले होते, ज्यामध्ये सर्व मोठे स्टार्स सहभागी झाले होते. यादरम्यान त्यांनी या सिनेमाचा सिक्वेल बनवण्याची घोषणा केली. त्यामागे त्यांनी एक मजेशीर कारणही सांगितले.

एसएस राजामौली यांच्या 'RRR' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. 12 दिवसांत जगभरात 939.41 कोटींची कमाई केली आहे. निर्मात्यांसाठी हे मोठे यश आहे.  ६ एप्रिलला सायंकाळी त्याची सक्सेस पार्टी सुरू झाली. या पार्टीत RRRची टीम खूपच खूश दिसत होती. यादरम्यान चित्रपटात कोमारामची भूमिका साकारणाऱ्या ज्युनियर एनटीआरने त्याचा सीक्वल बनवण्याची इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले, 'मला वाटतं RRR ही फ्रँचायझी आहे आणि त्याचा पुढचा भाग बनवायला हवा.' यासोबतच त्याचा सीक्वल बनवला जाईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. यावर अभिनेता राम चरण (Ram charan) नेही सांगितले की, मलाही या चित्रपटाचा सिक्वेल हवा आहे.

राजामौली सिक्वेलवर काय म्हणाले?
निर्माते एसएस राजामौली यांना RRR च्या सिक्वेलबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की 'RRR 2020 मध्ये बनला होता आणि आता 2022 चालू आहे. मी अजूनही RRR ला  मिळालेल्या यशात स्वत:ला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्यासाठी या सिनेमाच्या सिक्वेल बनवणं ही आनंदाची बाब असेल ते फक्त यासाठी नाही की सिनेमा बॉक्स ऑफिसवर काय मिळवलं. तर या निमित्ताने मला पुन्हा एकदा राम चरण आणि  ज्युनियर एनटीआरसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. हे माझ्यासाठी जास्त रोमांचक असेल.शेवटी ते असेही म्हणाले की, ‘वेळ जाऊ द्या मग बघू पुढे काय होते.

Web Title: The sequel of Ram Charan and Jr NTR's RRR will come, Rajamouli said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.