लाईट्स, कॅमेरा और..; सलमानच्या आगामी 'सिकंदर' सिनेमाच्या शूटींगला सुरुवात, ब्रेसलेटने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 02:02 PM2024-06-28T14:02:55+5:302024-06-28T14:05:03+5:30

सलमान खानच्या आगामी सिकंदर सिनेमाची घोषणा झालीय. सलमान खानचा हा बहुचर्चित सिनेमा असल्याचं बोललं जातंय (salman khan, sikandar)

The shooting of Salman Khan upcoming movie Sikandar has started with rashmika mandanna | लाईट्स, कॅमेरा और..; सलमानच्या आगामी 'सिकंदर' सिनेमाच्या शूटींगला सुरुवात, ब्रेसलेटने वेधलं लक्ष

लाईट्स, कॅमेरा और..; सलमानच्या आगामी 'सिकंदर' सिनेमाच्या शूटींगला सुरुवात, ब्रेसलेटने वेधलं लक्ष

सलमान खानचं जगभरात फॅन फॉलोईंंग आहे. सलमान खानच्या सिनेमाची घोषणा झाल्यापासूनच सर्वांना उत्सुकता असते ती म्हणजे सिनेमा रिलीज कधी होणार. अशातच भाईजानच्या आगामी सिनेमाकडे सर्वांचं लक्ष आहे. हा सिनेमा म्हणजे 'सिकंदर'. साजीद नाडीयादवाला या सिनेमाची निर्मिती करत आहेत. 'सिकंदर' ची काहीच दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली. अशातच आजपासून 'सिकंदर'च्या शूटींगला सुरुवात झाल्याचं सांगण्यात येतंय. त्याविषयीचं पोस्टर निर्मात्यांनी शेअर केलंय. 

'सिकंदर'च्या शूटींगला सुरुवात

नाडियाडवाला ग्रँडसन या सिनेमाच्या निर्मात्यांनी इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये एक मोबाईल फोन दिसत आहे. ज्याच्या कव्हर पेजवर सिकंदरचे पोस्टर लावण्यात आले आहे. यामध्ये सलमान खान नेहमी वापरतो ते ब्रेसलेट दिसत आहे. सलमान खानचं निळ्या रंगाच्या खड्यावालं हे ब्रेसलेट चांगलंच लोकप्रिय आहे हे वेगळं सांगायला नको. त्यावर लिहिले आहे, 'लाइट...कॅमेरा आणि 'सिकंदर'!

'सिकंदर'मध्ये कलाकार कोण आणि कधी रिलीज होणार?

 सलमान खानचा आगामी सिनेमा 'सिकंदर'चं दिग्दर्शन दक्षिणेतील प्रसिद्ध दिग्दर्शक ए.आर. मुरुगदास करत आहेत. निर्मात्यांनी काही दिवसांपूर्वी सेटवरील एक झलक शेअर केली आहे, ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. पुढील वर्षी २०२५ मध्ये ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे. रश्मिका मंदाना या सिनेमात सलमानसोबत प्रमुख भूमिकेत आहे.

Web Title: The shooting of Salman Khan upcoming movie Sikandar has started with rashmika mandanna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.