फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 09:19 AM2024-09-29T09:19:12+5:302024-09-29T09:21:35+5:30

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनची फिनालेआधी वेळ बदलण्यात आलीय (bigg boss marathi 5)

The timing of Bigg Boss Marathi 5 has changed from 3rd October during the week of the finale | फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार

फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनची सध्या चांगलीच चर्चा आहे. या सीझनमध्ये एकापेक्षा एक स्पर्धक सहभागी आहेत. बिग बॉस मराठीचा हा नवीन सीझन १०० नव्हे तर ७० दिवसांचा असणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आधीच धक्का बसलाय. अशातच बिग बॉस मराठीच्या  फिनानेला आठवडा बाकी असताना बिग बॉस मराठीची वेळ बदलण्यात आलीय. त्यामागचं कारणही समोर आलंय. जाणून घ्या सविस्तर

बिग बॉस मराठीची वेळ बदलली

बिग बॉस मराठीच्या फिनालेला एक आठवडा बाकी असताना बिग बॉस मराठीच्या वेळेत मोठा बदल करणार आलाय. बिग बॉस मराठी ३ ऑक्टोबरपासून ९ ऐवजी ९.३० वाजता बघायला मिळणार आहे. यामागचं कारण म्हणजे, कलर्स मराठीवर ३ ऑक्टोबरपासून 'आई तुळजाभवानी' ही नवी मालिका सुरु होणार आहे. ३ ऑक्टोबरपासून रात्री ९ वाजता ही मालिका टेलिकास्ट होत असल्याने बिग बॉस मराठीची वेळ बदलण्यात आलीय. 


या आठवड्यात कोण जाणार घराबाहेर?

बिग बॉस मराठीमध्ये या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी सध्या घरात असलेले सर्वच सदस्य नॉमिनेट झाले आहेत. अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, अंकिता वालावलकर, पॅडी कांबळे, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर, वर्षा उसगांवकर हे आठ जण घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट आहेत. या ८ जणांपैकी आज कोण सेफ होणार आणि कोण घराबाहेर जाणार? याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Web Title: The timing of Bigg Boss Marathi 5 has changed from 3rd October during the week of the finale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.