प्रभास-दीपिकाच्या 'कल्की 2898 एडी'चा ट्रेलर या दिवशी येणार भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 02:05 PM2023-12-30T14:05:19+5:302023-12-30T14:05:48+5:30

'आदिपुरुष' फ्लॉप झाल्यानंतर प्रभासने पुन्हा एकदा 'सालार'च्या रुपात हिट चित्रपट देऊन बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. त्याच वेळी, आता प्रभासचे चाहते त्याच्या पुढील पॅन इंडिया चित्रपट 'कल्की 2898 एडी' (Kalki 2898 AD) ची वाट पाहत आहेत.

The trailer of Prabhas-Deepika's 'Kalki 2898 AD' will be released on this day | प्रभास-दीपिकाच्या 'कल्की 2898 एडी'चा ट्रेलर या दिवशी येणार भेटीला

प्रभास-दीपिकाच्या 'कल्की 2898 एडी'चा ट्रेलर या दिवशी येणार भेटीला


साऊथ स्टार प्रभास (Prabhas) 'सालार' (Salaar Movie) चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याच्या कथेने चाहत्यांना प्रचंड प्रभावित केले आहे. 'आदिपुरुष' फ्लॉप झाल्यानंतर प्रभासने पुन्हा एकदा 'सालार'च्या रुपात हिट चित्रपट देऊन बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. त्याच वेळी, आता प्रभासचे चाहते त्याच्या पुढील पॅन इंडिया चित्रपट 'कल्की 2898 एडी' (Kalki 2898 AD) ची वाट पाहत आहेत. या सिनेमात प्रभास पहिल्यांदाच दीपिका पादुकोण(Deepika Padukone)सोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. 'कल्की 2898 एडी'चे काही पोस्टर्स समोर आले असून आता या चित्रपटाचा ट्रेलर कधी रिलीज होणार याबद्दल नवीन अपडेट समोर आली आहे .

दिग्दर्शक अश्विन नाग यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेला 'कल्की 2898 एडी' हा प्रभासच्या बिग बजेट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाच्या पोस्टर्स आणि स्टारकास्टबाबत यापूर्वीच करार झाला आहे. आता चाहत्यांच्या नजरा ट्रेलरकडे लागल्या आहेत, तो कधी प्रदर्शित होणार, याचा खुलासा अश्विन नाग यांनी आयआयटी बॉम्बे येथे झालेल्या कार्यक्रमात केला. शुक्रवारी येथे एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी सांगितले की, 'कल्की 2989 एडी'चा ट्रेलर 93 दिवसांनी प्रदर्शित होणार आहे. म्हणजेच मार्चच्या शेवटी किंवा एप्रिलच्या सुरुवातीला ट्रेलर पाहता येईल. 

'कल्की 2898 एडी' ची स्टार कास्ट
दीपिका व्यतिरिक्त मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत प्रभासचा हा पहिला प्रोजेक्ट आहे. याशिवाय आणखी प्रसिद्ध व्यक्तींचा अभिनयही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या स्टार कास्टमध्ये कमल हासन आणि दिशा पटानी यांच्या नावाचाही समावेश आहे. अश्विन नाग म्हणाले की, या सर्व कलाकारांचे सिनेमावर खूप प्रेम आहे. 

Web Title: The trailer of Prabhas-Deepika's 'Kalki 2898 AD' will be released on this day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.