"ग्लॅमरची दुनिया अस्सल गावरान मातीत खेचून आणली", किरण मानेंची सूरजसाठी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 07:17 PM2024-10-18T19:17:23+5:302024-10-18T19:18:05+5:30

अभिनेता किरण माने (Kiran Mane) यांनी सूरज चव्हाणसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्याच्या पहिल्या चित्रपटाचाही उल्लेख केला आहे.

"The world of glamor has been brought to the authentic Gavran soil", a special post by Kiran Mane for Sooraj | "ग्लॅमरची दुनिया अस्सल गावरान मातीत खेचून आणली", किरण मानेंची सूरजसाठी खास पोस्ट

"ग्लॅमरची दुनिया अस्सल गावरान मातीत खेचून आणली", किरण मानेंची सूरजसाठी खास पोस्ट

काही दिवसांपूर्वी बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा ग्रॅण्ड फिनाले पार पडला. यंदाच्या सीझनचा विजेता सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण (Suraj Chavan) विजेता झाला आहे. त्याने हा किताब जिंकल्यापासून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. दरम्यान अभिनेता किरण माने (Kiran Mane) यांनी सूरज चव्हाणसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्याच्या पहिल्या चित्रपटाचाही उल्लेख केला आहे.

किरण माने यांनी इंस्टाग्रामवर चित्रपटाचा पोस्टर शेअर करत लिहिले की, ...सुरज चव्हाण या नावानं आज ग्लॅमरची दुनिया आपल्या अस्सल गावरान मातीत खेचून आणली. इंडस्ट्रीतल्या आजच्या अनेक मोठमोठ्या स्टार्सना पहिला ब्रेक देणार्‍या केदार शिंदेसारख्या गाॅडफादरनं सुरजला एक सिनेमा दिला. रितेश देशमुखनंही त्याला त्याचा मॅनेजर दिला आहे, अशी बातमी वाचली मी परवा. लै भारी वाटतं हे सगळं बघून. पण एक गोष्ट त्याहून भारी वाटली. ती म्हणजे यापुर्वी सुरज जेव्हा फक्त एक रीलस्टार होता, तेव्हा त्याचं टॅलेंट शिवाजी दोलताडे या कर्जत तालुक्यातल्या कोरेगांवच्या दिग्दर्शकानं हेरलं होतं. त्याला एका सिनेमात सेकंड लीड भुमिका दिली होती. तो सिनेमा आज, १८ ऑक्टोबरपासून संपुर्ण महाराष्ट्रात रिलीज होतोय... 'राजा राणी' !


त्यांनी पुढे म्हटले की, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातले, सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी घरातले कलाकार या सिनेमात चमकत आहेत. रोहन पाटील आणि वैष्णवी शिंदे ही जोडगोळी प्रमुख भुमिकेत आहे. माझा दोस्त आणि 'सैराट' फेम तानाजी गळगुंडे यानंसुद्धा सुरज बरोबर काॅमेडीची मैफल रंगवली आहे. आपल्या मातीतल्या कलाकारांचा गावरान तडका असलेला भन्नाट सिनेमा आजपासून रिलीज होतोय... आपल्या पोरांसाठी मी बघणार.. तुम्हीही नक्की बघा... राजा राणी !
 

Web Title: "The world of glamor has been brought to the authentic Gavran soil", a special post by Kiran Mane for Sooraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.