रंगभूमी-कलाकार नाते आई-मुलासारखे

By Admin | Published: November 27, 2014 01:27 AM2014-11-27T01:27:21+5:302014-11-27T01:27:21+5:30

मराठी संगीत रंगभूमीच्या इतिहासात तब्बल 1क्6 वर्षे ललितकलादर्श ही संस्था कार्यरत आहे.

Theater-actor relationship is like a mother and a child | रंगभूमी-कलाकार नाते आई-मुलासारखे

रंगभूमी-कलाकार नाते आई-मुलासारखे

googlenewsNext
राज चिंचणकर ल्ल मुंबई
मराठी संगीत रंगभूमीच्या इतिहासात तब्बल 1क्6  वर्षे ललितकलादर्श ही संस्था कार्यरत आहे. या नाटय़संस्थेचे अध्वर्यू नटवर्य भालचंद्र पेंढारकर यांचा 94 वा वाढदिवस म्हणजे पावणोदोनशे वर्षाची परंपरा सांगणा:या मराठी रंगभूमीच्या वर्तमानातला अत्युच्च क्षण म्हणावा लागेल. मराठी रंगभूमीवर ज्यांना अण्णा या आदरार्थी नावाने संबोधले जाते, त्या पेंढारकरांचा वारसा पुढच्या पिढीतही आता संक्रमित झाला आहे. अशा अण्णा पेंढारकर यांचा वाढदिवस साजरा करण्याची तयारी मराठी नाटय़ कलाकार संघाने केली होती; मात्न या सोहळ्याला अण्णा येतील की नाही, हा प्रश्न तमाम रसिकांना पडला होता. परंतु काही क्षणांतच मंगळवारी संध्याकाळी अण्णा पेंढारकर यांनी यशवंत नाटय़गृहाच्या रंगमंचावर एन्ट्री घेतली आणि अवघे नाटय़गृह आपसूक उठून उभे राहिले.
वयोपरत्वे चाकांच्या खुर्चीत स्थानापन्न झालेल्या अण्णांना पाहून अनेकांचे हृदय गलबलले; कलाकार संघाचे अध्यक्ष प्रदीप कबरे यांच्यासह मोहन जोशी, शरद पोंक्षे, फैय्याज, अरुण काकडे, वंदना गुप्ते, गिरीश ओक, विजय कदम, अविनाश नारकर, विजय गोखले, भरत दाभोळकर, सुशांत शेलार, जयंत ओक आदी कलावंतांच्या साक्षीने अण्णांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.  ‘रंगात रंगले रंगकर्मी’ सोहळ्यात अण्णा पेंढारकर यांनी रंगकर्मीना दिलेल्या संदेशाचे वाचन शरद पोंक्षे यांनी केले. 
पेंढारकरांनी संदेशात रंगभूमी आणि कलाकार यांचे नाते आई व मुलासारखे असते. कोणत्याही कलाकाराचा जन्म हा रंगभूमीवरच होतो. शिस्तीचे पालन करणारे रंगकर्मी बेशिस्त मुलांचे कधीच लाड करत नाहीत. रंगभूमीच्या प्रकाशमान चौकटीत कुठली तरी ऊर्जा काम करत असते, हे मी माङया अनुभवावरून सांगतो. हीच ऊर्जा अशक्याचे शक्य करून दाखवते. म्हणूनच आपण रंगभूमीची पूजा करतो, मात्र तीर्थासारख्या पवित्न अशा रंगभूमीचा कुणी अवमान करतो, तेव्हा  खूप त्नास होतो. आपल्या कलागुणांना वाव देणारी व्यक्ती म्हणजे निर्माता आहे. प्रत्येक कलाकाराने जीवनात एक तरी व्यावसायिक निर्मिती करून बघावी, म्हणजे नाटकाच्या प्रयोगाची अनेक गणिते त्याला समजतील, असेही ते म्हणाले.
 
च्अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी या वेळी व्यासपीठावरून कलाकारांच्या कामाबद्दलचा मुद्दा छेडला. ते म्हणाले, मराठी मालिकांमध्ये काम करणा:या कलावंतांच्या तब्येतीचा किंवा आजारपणाचा कुणीही विचार करत नाही. अतुल अभ्यंकर हे याचे अलीकडचे उदाहरण आहे. 
च्मालिकावाल्यांसाठी एक माणूस गेला, तरी त्याची जागा घेण्यासाठी दुसरा माणूस  तयार असतो. कलावंत मालिकेतल्या कामावर अवलंबून असले तरी त्यांनी मालिकावाल्यांची लाचारी पत्करू नये. प्रश्न सोडवण्यासाठी कलावंतांची युनियन असलीच पाहिजे. 

 

Web Title: Theater-actor relationship is like a mother and a child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.