तुलनेचा काही प्रश्नच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2017 01:09 AM2017-04-29T01:09:36+5:302017-04-29T01:09:36+5:30

एका प्रसिद्ध मालिकेचा दुसरा सीझन सध्या प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या दुसऱ्या सीझनमध्ये अविनेश रेकी हा अभिनेता उमाशंकर

There is no question of comparison | तुलनेचा काही प्रश्नच नाही

तुलनेचा काही प्रश्नच नाही

googlenewsNext

एका प्रसिद्ध मालिकेचा दुसरा सीझन सध्या प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या दुसऱ्या सीझनमध्ये अविनेश रेकी हा अभिनेता उमाशंकर ही भूमिका साकारत आहे. त्याच्या या भूमिकेबाबत त्याच्याशी मारलेल्या गप्पा...
या मालिकेचा पहिला सीझन प्रचंड गाजला होता. तू त्याचे काही भाग पाहिले होते का?
- मी या मालिकेच्या पहिल्या सीझनबद्दल चांगलेच ऐकले होते. पण, मालिका पाहण्याची संधी मला मिळाली नाही. मला ही मालिका आॅफर झाल्यानंतर मी पहिल्या सीझनचे काही भाग पाहिले. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक जागा निर्माण केली आहे. त्यामुळे आमची जबाबदारी वाढली आहे.
तू अनेक मालिकांमध्ये काम केले आहेस. या मालिकेत काम करण्याचा अनुभव कसा आहे?
- या मालिकेत मी अतिशय शुद्ध हिंदी बोलणाऱ्या एका मुलाची व्यक्तिरेखा साकारत आहे. त्यामुळे मला माझ्या हिंदीवर खूप मेहनत घ्यावी लागत आहे. या मालिकेचे चित्रीकरण राजस्थान, केरळ अशा विविध ठिकाणी झाले आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांनीच या मालिकेचे चित्रीकरण खूप एन्जॉय केले.
पहिला सीझन आणि दुसरा सीझन यांमध्ये लोक तुलना करणार, असे वाटत नाही का?
- एखाद्या व्यक्तिरेखेला तुम्ही रिप्लेस करता, त्यावेळी तुलना होते. पण, ही मालिका पहिल्या सीझनपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. पहिल्या सीझनची कथा जिथे संपली, तिथून आमच्या मालिकेची कथा सुरू झाली आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची तुलना होईल, असे मला तरी वाटत नाही.
तुझ्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात कशी झाली?
- मी अभिनय क्षेत्रात येण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्न करीत होतो. मी अनेक आॅडिशन दिली होती. त्यादरम्यान मी नोकरीदेखील केली. नोकरी सांभाळून मी आॅडिशन देत असे. या क्षेत्रातील प्रवास सुरळीत सुरू झाल्यावर मी नोकरी सोडून दिली आणि काहीच वर्षांत मी या क्षेत्रात स्थिरावलो.

Web Title: There is no question of comparison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.