‘या’ दिग्दर्शकांनी भूमिका साकारत अजरामर केल्या कलाकृती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2017 04:58 AM2017-02-20T04:58:37+5:302017-02-20T04:58:37+5:30

सिनेसृष्टीत अनेक कलाकृती आत्तापर्यंत उत्कृष्ट दिग्दर्शनाच्या जोरावर अजरामर झाल्या. कलाकार होणं हे जसं कलाकाराच्या

'These' artists doing amazing artistic role ... | ‘या’ दिग्दर्शकांनी भूमिका साकारत अजरामर केल्या कलाकृती...

‘या’ दिग्दर्शकांनी भूमिका साकारत अजरामर केल्या कलाकृती...

googlenewsNext

- Aboli Kulkarni -
सिनेसृष्टीत अनेक कलाकृती आत्तापर्यंत उत्कृष्ट दिग्दर्शनाच्या जोरावर अजरामर झाल्या. कलाकार होणं हे जसं कलाकाराच्या रक्तातच असावं लागतं. तसंच चित्रपटाच्या कथानकाला योग्य दिशा देणे हे देखील एका जाणकार दिग्दर्शकाचं वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. आजतागायत अनेक क लाकारांनी दिग्दर्शनाच्या क्षेत्रात आपले नशीब आजमावून पाहिले. अनेकांनी यशाचे इमले रंगवले तर अनेकांच्या पदरी निराशा आल्याने त्यांनी दिग्दर्शनाचा नाद सोडला. पण, तुम्हाला माहितीये का, असे अनेक दिग्दर्शक आहेत ज्यांनी यशाचा मार्ग स्वीकारण्यासाठी दिग्दर्शनासह स्वत:च मुख्य भूमिक ा करण्याची तयारी दाखवली. आश्चर्य वाटेल पण त्यातील काही चित्रपटांनी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले. आजही हे चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. पाहुयात, मग असे ‘बी टाऊन’चे कोण दिग्दर्शक आहेत ज्यांनी त्यांच्याच चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत...

राज कपूर :
बॉलिवूडचा ‘रोमँटिक हिरो’ म्हणून राज कपूर यांच्याकडे पाहिले जाते. यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यात आग (१९४८), आवारा (१९५१), बरसात (१९४९), मेरा नाम जोकर (१९७०), संगम (१९६४) यांचा समावेश आहे. या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका तर केलीच पण चित्रपटांचे दिग्दर्शनही केले. तत्कालिन कार्यकाळात त्यांचा अभिनय आणि दिग्दर्शन यांच्याशी ऋणानुबंधाचा संबंध होता.

आमिर खान :
बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून आमिर खानला ओळखले जाते. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘दंगल’ चित्रपटातील त्याचा उत्कृष्ट अभिनय पाहिल्यानंतर त्याने एखाद्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असेल का? असा प्रश्न आपसूकच मनात आला. ‘तारे जमीं पर’ या त्याने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर तुफान कमाई केली. या चित्रपटानंतर लहान मुलांच्या भावनिक विश्वावर सर्वसामान्य पालकही लक्षकेंद्रित करू लागले. एकं दर काय? तर आमिर एक उत्कृष्ट कलाकाराबरोबरच एक दिग्दर्शकही आहे, हे संपूर्ण ‘बी टाऊन’ला कळून चुकले. यात आमिरने एका कला शिक्षकाची भूमिका साकारली होती. ती प्रेक्षकवर्गाला प्रचंड भावली.

अजय देवगन :
मोजक्याच चित्रपटातून उत्कृष्ट भूमिका साकारणारा अभिनेता म्हणून अजय देवगनकडे पाहिले जाते. बॉलिवूडची ‘सिमरन’ काजोलचा पती अजय देवगन त्याच्या हटके आणि गंभीर अभिनयामुळे ओळखला जातो. त्याने दिग्दर्शित केलेला ‘शिवाय’ चित्रपट बॉक्स आॅफिसवर आपटला असला तरीही चित्रपटाच्या कथानकावर त्याने घेतलेली मेहनत ही खरंच कौतुकास्पद होती. याशिवाय त्याने ‘यू मी और हम’ हा चित्रपट पत्नी काजोलसोबत केला. हा चित्रपट २००८ साली फार काही कमाल दाखवू शकला नसला तरीही या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात घर केले. चित्रपटाचे आगळेवेगळे कथानक आणि काजोलचा दमदार अभिनय यांच्यामुळे अजय देवगनने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटांची नेहमीच चर्चा केली जाते.

प्रकाश झा :
सामाजिक विषय, जातीप्रथा, रूढीपरंपरांना विरोध, स्त्रियांचे प्रश्न अशा नाजूक विषयांना उत्तम प्रकारे हाताळणारे दिग्दर्शक म्हणजे प्रकाश झा. अपहरण’, ‘राजनिती’, ‘गंगाजल’, ‘सत्याग्रह’ या चित्रपटांचे प्रकाश झा यांनी दिग्दर्शन केले. कामाच्या बाबतीत कडक आणि वेळ पाळणारे प्रकाश झा यांचे बॉलिवूडमध्ये एक वजन तयार झालेले आहे. मग त्यांनी एकदा तरी चित्रपटात काम केले आहे का? असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण होणं साहजिकच आहे. त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या ‘गंगाजल २’ या चित्रपटात त्यांनी ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा हिच्यासोबत भूमिका साकारली आहे. तेव्हा एका मुलाखतीत बोलताना प्रियांका म्हणाली,‘ प्रकाश झा या कडक शिस्तीच्या दिग्दर्शकासोबत काम करायला मलाही फार भीती वाटत होती. मात्र, मला त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले.’

कमल हसन :
निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता, कथालेखक, नृत्य दिग्दर्शक, गायक अशा वेगवेगळ्या पातळयांवर सिनेसृष्टीचा प्रवास क रणारा हरहुन्नरी कलाकार म्हणजे कमल हसन. कोणतीही भूमिका आव्हानापेक्षा जबाबदारी म्हणून त्यांनी स्वीकारली. १९९७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘चाची ४२०’ आणि २००० मध्ये आलेल्या ‘हे राम’ या दोन्ही चित्रपटांचे त्याने दिग्दर्शन केले. याच चित्रपटांमध्ये त्यांनी आगळ्यावेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.

देवानंद :
‘बॉलिवूडचा प्रेमपुजारी’ म्हणून अभिनेता देवानंदने एक काळ गाजवला. तत्कालिन अभिनेत्री कोणत्याही अटीवर त्याच्यासोबत काम करायला तयार असायच्या. अभिनयासोबतच त्याने दिग्दर्शनाचीही धुरा उत्तमप्रकारे सांभाळली. ‘हरे रामा हरे कृष्णा’ (१९७१) ,‘हिरा पन्ना’
(१९७३), देस परदेस (१९७८), आनंद और आनंद (१९८४), सच्चे का बोलबाला (१९८९), मैं सोलह बरस की (१९९८) या चित्रपटांचे दिग्दर्शनही त्याने केले आणि अभिनयही त्यानेच साकारला.

Web Title: 'These' artists doing amazing artistic role ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.