'तारे जमीन पर' सिनेमात आमिर खानच्या आधी या अभिनेत्याची लागली होती वर्णी, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 11:30 AM2022-10-19T11:30:06+5:302022-10-19T11:32:50+5:30
Aamir Khan: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने 'तारे जमीन पर' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. हा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला होता.
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान(Aamir Khan)ने 'तारे जमीन पर' (Taare Zameen Par) या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. हा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला होता. ऑस्करमध्ये अधिकृतपणे जाणारा हा भारतातील पहिला चित्रपट ठरला. हा चित्रपट असा होता, की पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले. चित्रपट दिग्दर्शक अमोल गुप्ते (Amol Gupte) यांनी ज्याप्रकारे वास्तवाची मांडणी केली, ती सर्वांच्या मनाला भिडली. पण तुम्हाला माहित आहे का की अमोल गुप्तेच्या मनात या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेसाठी आमिर खान नाही तर अक्षय खन्ना होता. त्याला अक्षयला कला शिक्षक राम शंकर निकुंभची भूमिका ऑफर करायची होती.
अक्षय खन्नाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याबाबत सांगितले. अमोल गुप्ते अक्षय खन्नाला ओळखत नव्हता. अशा स्थितीत त्याने आमिर खानला अक्षय खन्नासोबत ओळख करून देण्यास सांगितले. आमिरने अमोलला आधी चित्रपटाचे वर्णन द्यायला सांगितले, जेणेकरून तो अक्षयला काही सांगू शकेल. पण आमिर हा आमिर आहे. जर मला चित्रपटाचे वर्णन आवडले तर मी अक्षयला सांगेन असेही आमिर म्हणाला होता. शेवटी जेव्हा अमोलने त्याला स्क्रिप्ट सांगितली तेव्हा आमिरला ही भूमिका इतकी आवडली की त्याने स्वतः अमोलला त्याला ही भूमिका करायला द्यावी म्हणून मनवले आणि शेवटी आमिरनेच हा चित्रपट केला.
आमिर खानने अक्षय खन्नाकडून चित्रपट हिसकावून घेतला हे अभिनेत्याला फारसे आवडले नाही. जेव्हा ते दोघे भेटतात तेव्हा आमिर आणि अक्षय त्याबद्दल बोलतात. अक्षय एकच उत्तर देतो, 'नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम'. मात्र, दुसरीकडे अक्षय असेही म्हणतो की, आमिर खानने ज्या पद्धतीने ती भूमिका साकारली, ती कदाचित तो करू शकणार नाही. त्या भूमिकेत आमिर खूपच छान दिसत होता. त्यामुळे कुठेतरी हेही ठीक आहे, आमिरच्या हातात हा चित्रपट आला. त्याने ते अधिक चांगल्या पद्धतीने केला.