बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला समजायचे जया बच्चन यांची सख्खी बहीण, एकटीनेच जगली संपूर्ण आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 05:40 PM2023-05-01T17:40:47+5:302023-05-01T17:41:16+5:30
बॉलिवूड अभिनेत्री रिता भादुरी (Rita Bhaduri) यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्ये अनेक प्रकारच्या भूमिका केल्या आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री रिता भादुरी (Rita Bhaduri) यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्ये अनेक प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. त्या काही चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेतही झळकल्या होत्या आणि काही चित्रपटांमध्ये त्या सहाय्यक भूमिकेत दिसल्या होत्या. पण, आईच्या भूमिकेतून रीता भादुरी यांना प्रेक्षकांच्या मनात खरी ओळख मिळाली. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारली आणि या भूमिकेसाठी त्या प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाली. त्यांच्या अभिनयासोबतच रिता आणखी एका गोष्टीसाठी चर्चेत होती. खरे तर त्यांचे नाव अनेकदा बच्चन कुटुंबाशी जोडले जात होते. भादुरी या आडनावामुळे त्यांना अनेकदा बिग बींची मेहुणी म्हणजेच जया बच्चन (Jaya Bachchan) यांची बहीण मानले जात होते आणि त्यांना हे अजिबात आवडत नव्हते.
इतकेच नाही तर एकदा एका मुलाखतीत रीता भादुरी यांनी जया भादुरी यांची बहीण मानली जात असल्याबद्दल प्रतिक्रिया दिली होती आणि त्या म्हणाल्या होत्या की, 'एकदा मला जयपूरहून कोणाचा तरी फोन आला आणि त्यांनी मला विचारले की मी जया बच्चनची बहीण आहे का? मी बहीण? हे ऐकून मला खूप राग आला.' रीता म्हणाल्या की 'मी इंडस्ट्रीत खूप दिवसांपासून आहे, पण आजपर्यंत लोकांना माहित नाही की आमच्यात काही संबंध नाही. लोक नेहमी विचार करतात की आपण बहिणी आहोत. पण, ठीक आहे, आता ही गोष्ट मला त्रास देत नाही.
हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त रिता भादुरी यांनी आपल्या करिअरमध्ये मल्याळम आणि गुजराती चित्रपटांमध्येही काम केले. त्यांनी १९७१ मध्ये पुण्यातून अभिनयाचा कोर्स केला आणि १९७४ पासून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ‘आयना’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात त्यांनी साईड रोल केला होता. त्या हिंदी चित्रपटांमध्ये मोठी अभिनेत्री बनू शकल्या नाहीत, परंतु कमल हासनसोबत एका मल्याळम चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्यांना हिंदी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका मिळणे बंद झाले. रिटा भादुरी हे गुजराती चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव होते.
याशिवाय त्यांनी अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केले. तिने मंझिल, निमकी मुखिया, साराभाई वर्सेस साराभाई, अमानत, छोटी बहू, कुमकुम, खिचडी, बनी-इश्क दा कलमा, एक नई पहचान अशा अनेक मालिकेत काम केले आणि अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये आईची भूमिका केली. रिता भादुरी यांनी आयुष्यात कधीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यांच्या या निर्णयावर त्या खूप खूश होत्या. रिता मुंबईत त्यांच्या फ्लॅटमध्ये राहत होत्या.