या चिमुकल्यानं 'कभी खुशी कभी गम'मध्ये साकारलीय छोट्या शाहरुखची भूमिका; आज आहे पॉप्युलर स्टारकिड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 06:00 AM2023-04-06T06:00:00+5:302023-04-06T06:00:02+5:30

या स्टारकिडने, शाहरुख खानच्या K3G चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. आज त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात.

This little one played the role of little Shah Rukh in 'Kabhi Khushi Kabhi Gham'; Today is Popular Starkid | या चिमुकल्यानं 'कभी खुशी कभी गम'मध्ये साकारलीय छोट्या शाहरुखची भूमिका; आज आहे पॉप्युलर स्टारकिड

या चिमुकल्यानं 'कभी खुशी कभी गम'मध्ये साकारलीय छोट्या शाहरुखची भूमिका; आज आहे पॉप्युलर स्टारकिड

googlenewsNext

सध्या बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सचा बोलबाला आहे. रणबीर कपूर असो की जान्हवी कपूर किंवा सारा अली खान, या स्टारकिड्सनी बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला आहे. स्टारकिड्सची एक झलक पाहण्यासाठी लोक आतुर आहेत, तसेच हे स्टारकिड्स त्यांच्या बालपणात कसे दाखवायचे हे जाणून घ्यायचे आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्टारकिड्सचे बालपणीचे फोटो दाखवत आहोत. जया बच्चन यांच्या मांडीवर बसलेल्या या मुलाला ओळखलंत का?, बॉलिवूडमधील सुपरस्टारचा हा मुलगा आहे. 

या फोटोमध्ये जया बच्चन एका निरागस आणि गोंडस बाळाला आपल्या कुशीत घेऊन दिसत आहेत. हे फोटो एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान काढण्यात आले आहे. या चित्रपटात या मुलाने बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या बालपणीची भूमिका साकारली होती.

फोटोत दिसणार हा चिमुकला आर्यन खान आहे शाहरुख खानचा मोठा मुलगा आहे, ज्याचा जन्म 13 नोव्हेंबर 1997 रोजी दिल्लीत झाला होता. आर्यनने कॅलिफोर्निया विद्यापीठातून शिक्षण घेतले असून तो लवकरच बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहे. मात्र, अभिनेता म्हणून आर्यनने बालवयातच चित्रपटांमध्ये पदार्पण केले आहे.
 

Web Title: This little one played the role of little Shah Rukh in 'Kabhi Khushi Kabhi Gham'; Today is Popular Starkid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.