"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 08:05 PM2024-09-30T20:05:42+5:302024-09-30T20:06:21+5:30

Bigg Boss Marathi Season 5 Pandharinath Kamble: बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमधून अभिनेता पंढरीनाथ कांबळे बाहेर पडला आहे. त्यानंतर आता त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

"This 'Pandhari' will continue forever and...", Paddy Kamble's post in discussion | "हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत

"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत


हास्यसम्राट पंढरीनाथ कांबळेने मालिका, नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे काम केले आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमधून अभिनेता घराघरात लोकप्रिय झाला. वेगवेगळी कॅरेक्टर्स करणारा हा माणूस स्वतःच एक कॅरेक्टर आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरातदेखील त्याच्या या कॅरेक्टरने प्रेक्षकांची मने जिंकली. दरम्यान अलिकडेच अभिनेत्याला बिग बॉसच्या घरातून निरोप घ्यावा लागला. दरम्यान आता त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळेने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत लिहिले की, बिग बॉस मराठी सिझन ५  या खेळात सहभागी झाल्यापासून आपणा प्रेक्षकांचे शक्य होते तितके निखळ मनोरंजन करण्याचे प्रामाणिक प्रयत्न मी केले. या खेळातील प्रवासात अनेक नवीन माणसं माझ्या आयुष्यात आली आणि ही माणसं माझ्या आयुष्यात कायम राहतील असा मला विश्वास आहे. या प्रवासात बरंच काही शिकलो इथल्या लोकांनी कायम कळत नकळत खूप काही शिकवलं. 


त्याने पुढे म्हटले की, या घरात मी जे काही चांगल करू शकलो ते केवळ आणि केवळ आपण दिलेल्या प्रेमामुळेच. त्यामुळे आपण रसिक मायबाप प्रेक्षकांनी भरभरून दिलेल्या प्रेमासाठी आपले मनापासून आभार! घरातील उर्वरीत सर्व सदस्यांना अंतीम फेरीसाठी मनापासून शुभेच्छा! माझा हा प्रवास इथे संपला तरी, त्या ‘पंढरी’ने दाखवलेल्या वाटेवर हा ‘पंढरी’ कायम चालत राहील आणि आपल्या चेहऱ्यावर कायम हसू आणण्याचा प्रयत्न करत राहील. धन्यवाद! 

Web Title: "This 'Pandhari' will continue forever and...", Paddy Kamble's post in discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.