असा होणार 'आई कुठे काय करते'चा शेवट, आप्पा लावून देणार का अरुंधती- आशुतोषचं लग्न?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 06:00 AM2022-03-16T06:00:00+5:302022-03-16T06:00:00+5:30

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte ) ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. सध्या मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.

This will be the end of 'Aai Kuthe Kay Karte' | असा होणार 'आई कुठे काय करते'चा शेवट, आप्पा लावून देणार का अरुंधती- आशुतोषचं लग्न?

असा होणार 'आई कुठे काय करते'चा शेवट, आप्पा लावून देणार का अरुंधती- आशुतोषचं लग्न?

googlenewsNext

टेलिव्हिजनवरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte ) ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. सध्या मालिका उत्कंठावर्धक वळणावर आहे. नुकतेच मालिकेत आशुतोषने देशमुख कुटुंबासमोर अरुंधतीवरील प्रेमाची कबुली दिली. त्यावेळी तिथे कांचन आई, संजना, अनिरुद्ध, अनघा, अविनाश आणि अभिषेक उपस्थित होते. या नवीन ट्वीस्टमुळे मालिकेत काय घडणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. दरम्यान आता सोशल मीडियावर मालिकेचा शेवट कसा होणार याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत. यासाठी अरुंधतीचे सासरे आप्पा पुढाकर घेऊन त्या दोघांचे लग्न लावून देणार असल्याची चर्चा रंगली आहे.

आशुतोषने देशमुख कुटुंबासमोर अरुंधतीवरील प्रेमाची कबुली दिल्यानंतर घरातील संपूर्णच वातावरण बदलून जाते. तसेच अरुंधती ज्याला मित्र समजत होती त्याच्या मनात आपल्याबद्दल अशा भावना असल्याचे समजल्यानंतर तीदेखील काही काळ अस्वस्थ होते. मात्र यश तिची समजूत काढतो आणि ती या विषयावर आशुतोषसोबत बोलायचे ठरविते. अरुंधती आशुतोष भेटतातआणि या भेटीमध्ये आशुतोषही अरुंधतीसमोर त्याचे मन मोकळे करतो. तो तिला सांगतो की, ' मी तुला विसरून जाईन असे मला वाटत होते. पण माझ्या मनात तू जशी होतीस, तू तशी आजही आहेस,' अशा शब्दांत आशुतोष त्याचे अरुंधतीवर असलेले प्रेम व्यक्त करतो. प्रेम व्यक्त करताना कोणतीच अपेक्षा नसल्याचेही तो त्यावेळी सांगतो. यानंतर तू जो निर्णय घेशील, तो मला मान्य असेल असेही सांगतो.
यानंतर अरुंधती आशुतोषसमोर तिने प्रेम फक्त अनिरुद्धवर केल्याचे सांगते. मात्र असे जरी असले तरी मित्र म्हणून मला तुझ्यासोबत काम करण्यासाठी कोणतीच अडचण नसल्याचेही स्पष्ट करते. मात्र यापेक्षा जास्त मला गुंतता येणार नाही असे ती सांगते. यानंतर मात्र भविष्यात घडू शकणाऱ्या घटनांची कल्पना मात्र तो अरुंधतीला देतो. 'जगातल्या अनेक लोकांना आपली मैत्री खटकणार आहे. त्यामुळे जोपर्यंत आपल्या मनात स्पष्टता आहे, तोपर्यंत आपण यातल्या कोणत्याच गोष्टीची पर्वा करण्याचे कारण नसल्याचे आशुतोष अरुंधतीला समजावताना दिसतो.


यानंतर अनघा आणि अविनाश हे आप्पांना सांगतात. ते सांगत असताना तिथं कांचन येते. तिला पाहून आप्पा अनघा आणि अविनाशला म्हणतात की, 'यांच्या मनातली घाण स्वच्छ होणारच नाही. अनिरुद्ध आता अरुंधतीचा नवरा नाहीये. पण बदललेली परिस्थिती समजून घ्यायचीच नाही. मी असतो तर त्याला सांगितले असते, मी माझ्या लेकीला समजावतो, तू तिच्याशी लग्न कर.. 'आप्पांचं हे बोलणे ऐकून कांचनला मोठा धक्का बसतो. या ट्विस्टमुळे सोशल मीडियावर अशी चर्चा रंगली आहे की, आई कुठे काय करते मालिकेचा शेवट हा अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नाने होणार आहे. मात्र हे खरे आहे का हे मालिकेच्या आगामी भागात समजेल.

Web Title: This will be the end of 'Aai Kuthe Kay Karte'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.