वज्रमध्ये दडली गुप्तहेराची गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2017 05:34 AM2017-01-13T05:34:15+5:302017-01-13T05:34:47+5:30

म यूर करंबळीकर दिग्दर्शित वज्र हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना

Thunderbolt is a secret thing | वज्रमध्ये दडली गुप्तहेराची गोष्ट

वज्रमध्ये दडली गुप्तहेराची गोष्ट

googlenewsNext

म यूर करंबळीकर दिग्दर्शित वज्र हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना गुप्तहेराची गोष्ट पाहायला मिळणार आहे. एका हिऱ्याच्या तपासाभोवती चित्रपटाची कथा फिरते. या चित्रपटात राहुल सोलापूरकर, उल्हास आढाव, अभिनीत पंगे, समर्थ बारी, मीरा पाथरकर या कलाकारांचा समावेश आहे. तसेच अभिनेत्री मानसी नाईक मुजरा करताना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ‘हाय-रब्बा हुस्न ये है, जलवा है ये, सारी रात का मकसद क्या है’ या गाण्यावर मानसी नाईक खास तिच्या अदांमध्ये मुजरा करताना पाहायला मिळणार आहे. या गाण्याला गायिका श्रीपर्णा चटर्जी हिने हे गाणे गायले आहे. या चित्रपटातील गाणी चंद्रमोहन यांनी लिहिली आहेत. तसेच त्यांनी या गाण्यांना संगीतसुद्धा दिले आहे. या चित्रपटाचे निर्माते शंतनु देशपांडे आहेत. या चित्रपटाविषयी दिग्दर्शक मयूर करंबळीकर सांगतात, ‘‘हा माझा दुसरा चित्रपट आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण करताना खूप मजा आली. पहिल्यांदा मराठी चित्रपटसृष्टीत गुप्तहेराची कथा घेऊन काही तरी वेगळा करण्याचा प्रयत्न केला आहे. आमची संपूर्ण टीम नवीन आणि तरुण आहे. आम्ही सगळ्यांनी या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. या चित्रपटाचे काही चित्रीकरण परदेशातदेखील झाले आहे. तसेच माझ्या पहिल्या चित्रपटाला कोल्हापूर आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये नामांकन मिळाले आहे. त्यामुळे वज्र हा चित्रपटदेखील असे यश मिळवेल, अशी अपेक्षा आहे.

Web Title: Thunderbolt is a secret thing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.