थायलंडमध्ये अडकलेल्या भारतीय व्यक्तीला सोनू सूदने मायदेशात आणले; सोनूवर कौतुकाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 05:38 PM2022-06-15T17:38:03+5:302022-06-15T17:39:15+5:30

थायलंडमध्ये नोकरीच्या सापळ्यात अडकलेल्या भारतीयाला सोनू सूदने मायदेशात आणले. त्याच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Tickets sent by Sonu Sood to a man stranded in Thailand; A shower of appreciation on sonu | थायलंडमध्ये अडकलेल्या भारतीय व्यक्तीला सोनू सूदने मायदेशात आणले; सोनूवर कौतुकाचा वर्षाव

थायलंडमध्ये अडकलेल्या भारतीय व्यक्तीला सोनू सूदने मायदेशात आणले; सोनूवर कौतुकाचा वर्षाव

googlenewsNext

मुंबई: लॉकडाऊनच्या काळात लोकांना मदत करून 'मसिहा' बनलेल्या बॉलीवूड अभिनेता सोनू सूदचे (Sonu Sood) मदतीचा सत्र अजूनही सुरूच आहे. आजही तो त्याच्या टीमसोबत अनेक गरजूंना सर्वतोपरी मदत करतो. अलीकडेच त्याने थायलंडमध्ये अडकलेल्या एका भारतीयाला मायदेशी परतण्यासाठी मदत केली. सोनूने त्या व्यक्तीला विमानाचे तिकीट पाठवले आणि भारतात येण्याची व्यवस्था केली.

11 जून रोजी साहिल खान नावाच्या ट्विटर युझरने सोनू सूदला ट्विटमध्ये टॅग करुन परत येण्यासाठी मदत मागितली होती. साहिलने लिहिले, “मी थायलंडमध्ये अडकलोय आणि येथून बाहेर पडण्याचा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. सोनू सर, मला मदत करा." सोनूने या ट्विटला फक्त एका दिवसात उत्तर दिले आणि सांगितले की, "आता कुटुंबाला भेटण्याची वेळ आलीय. मी तुला तिकीट पाठवत आहे."

साहिलने मानले आभार 
सोनू सूदच्या या उत्तराचा स्क्रीनशॉट शेअर करत साहिलने सोनूच्या मदतीबद्दल त्याचे आभार मानले. सोनू सूदने आपले काम अतिशय सक्रियपणे केले आणि दोन दिवसांनंतर साहिल आपल्या देशात परतला. साहिलने सोनूचे आभार मानत एक व्हिडिओ शेअर केला आहे. सोनू सूदनेही साहिल खानचा व्हिडिओ शेअर करत एक सुंदर संदेश पाठवला.

सोशल मीडियावर सोनू सूदचे कौतुक 
साहिलने सोनू सूदला टॅग करत लिहिले, “अखेर मी भारतात पोहोचलो, माझ्याकडे शब्दच नाहीत. तुमच्या यशासाठी मी नेहमी प्रार्थना करेन. तुम्ही माझ्यासाठी जे केले, ते कोणी करत नाही. तू खरा हिरो आहेस." साहिलच्या या व्हिडिओला उत्तर देताना सोनूने लिहिले की, "हिंदुस्थानी भाई आहेस... भारतात परत आणावे लागले." सोनूच्या या कामाचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. अभिनेत्याची ही उदात्त कृती प्रत्येक वेळी लोकांची मने जिंकते.

साहिल खान त्या देशात का अडकला?
साहिल पूर्व आशियाई देशात का अडकला याचे कारण जाणून घेण्यासाठी लोकांना उत्सुकता होती. त्यावर साहिलने नोकरीच्या नावाखाली फसवणूक झाली असून पासपोर्टही काढून घेतल्याचे उत्तर दिले. तो म्हणाला, “माझा पासपोर्ट घेण्यात आला आहे आणि आता मी परवानगीशिवाय देश सोडू शकत नाही. इंटरनेट कनेक्टिव्हिटीही नाही. सोनू सूदमुळेच मी त्या सापळ्यातून बाहेर पडू शकलो.”

Web Title: Tickets sent by Sonu Sood to a man stranded in Thailand; A shower of appreciation on sonu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.