सलमानच्या 'टायगर ३'मधील शाहरुखचा कैमिओ सीन लीक, जबरदस्त अॅक्शन करताना दिसला 'पठाण'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 09:48 AM2023-11-12T09:48:20+5:302023-11-12T09:49:03+5:30
Tiger 3 : 'टायगर ३' प्रदर्शित होताच शाहरुखचा सिनेमातील कैमिओ सीन लीक, व्हिडिओ व्हायरल
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा 'टायगर ३' आज सर्वत्र प्रदर्शित झाला. 'टायगर ३' प्रदर्शित करत सलमानने चाहत्यांना दिवाळीची खास भेट दिली. सलमानच्या या बहुचर्चित चित्रपटाच्या प्रतीक्षेत चाहते होते. अखेर दिवाळीच्या मुहुर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली होती. सलमानच्या या सिनेमात शाहरुख खान कैमिओ करताना दिसणार असल्याची चर्चा होती. 'टायगर ३' प्रदर्शित होताच या सिनेमातील शाहरुखचा कैमिओ सीन लीक झाला आहे.
शाहरुखच्या 'पठाण'ध्ये सलमान टायगर म्हणून कैमिओ करताना दिसला होता. आता भाईजानच्या टायगर ३मध्ये शाहरुखने कैमिओ केला आहे. 'टायगर ३'मधील शाहरुखचा कैमिओ सीन लीक झाला आहे. ट्वीटरवर चित्रपटातील हा सीन व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत शाहरुखच्या कैमिओ सीनला पठाणमधील गाणं वाजताना दिसत आहे. त्यानंतर शाहरुखची एन्ट्री होते. पठाणमध्ये शाहरुखला वाचवण्यासाठी सलमानने आला होता. आता टायगरच्या मदतीसाठी 'पठाण'ने एन्ट्री घेतली आहे. या व्हिडिओत शाहरुख आणि सलमान जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहेत.
Srk is coming
— Ratan Mondal (@RatanMo40278303) November 12, 2023
O bhai pura hila dala🎇🎇🎇
All the best from icon star fans #Tiger3#AlluArjun𓃵#Pushpa2TheRule#AlluArjunpic.twitter.com/bzXF24j7mO
'टायगर ३' मध्ये शाहरुखच्या कैमिओ जवळपास २० मिनिटांचा असल्याचं बोललं जात आहे. अभिनेता आणि चित्रपट समीक्षक केआरेकेने याबाबत ट्वीटही केलं होतं. शाहरुखबरोबरच 'टायगर ३'मध्ये बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनही कैमिओ करताना दिसणार आहे. हृतिकही टायगर ३मध्ये जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे.
दरम्यान, १२ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या 'टायगर ३' ने अॅडव्हान बुकिंगमधून मोठी कमाई केली आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच तब्बल २० कोटींचा गल्ला जमवला आहे. ३०० कोटींचं बजेट असलेला 'टायगर ३' बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड मोडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या चित्रपटात सलमानबरोबर कतरिना कैफ, इमरान हाशमी, आशुतोष राणा या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.