भावाप्रमाणेच ‘दबंग’ असलेल्या या ‘बोल्ड गर्ल’ने गुपचूप उरकला साखरपुडा?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 01:52 PM2019-09-06T13:52:47+5:302019-09-06T13:55:28+5:30
25 वर्षांच्या या ‘दबंग गर्ल’ने साखरपुडा केल्याचीही चर्चा आहे. पुरावा काय तर तिच्या बॉयफ्रेन्डची पोस्ट...
ठळक मुद्दे25 वर्षांची कृष्णा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. ती नेहमीच आपल्या मित्रांसोबत पार्टी करताना दिसते
अभिनेता जॅकी श्रॉफ यांची लेक आणि टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ सध्या तिच्या लव्हलाईफमुळे चर्चेत आहेत. कृष्णा दीर्घकाळापासूप एबन हायम्स याला डेट करतेय. अगदी अलीकडे दोघांच्या डिनर डेटचे फोटो समोर आले होते. आता कृष्णाने एबनसोबत साखरपुडा केल्याचे मानले जात आहे. होय, पुरावा काय तर एबनची पोस्ट. होय, बॉयफ्रेन्ड एबनने त्याच्या इन्स्टास्टोरीवर कृष्णाचा एक फोटो शेअर केला असून त्या फोटोला त्याने wifey अर्थात पत्नी म्हणून टॅग केले आहे.
या फोटोवरून कृष्णा व एबन लवकरच विवाहबंधनात अडकणार असे मानले जात आहे. दोघांनी साखरपुडा केल्याचीही चर्चा आहे.
कृष्णानेही एबनसोबतचा एक फोटो शेअर करत, तुझी सोबत कदाचित माझ्या नशीबात लिहिलेली होती, असे कॅप्शन दिले आहे. एकंदर काय तर कृष्णाचा रोमान्स जोरात आहे. एबन हा एक ऑस्ट्रेलियन बॉस्केटबॉल प्लेयर आहे. त्याच्याकडे ऑस्ट्रेलिया, इस्राईल व भारताचे नागरिकत्व आहे. एका ताज्या मुलाखतीत कृष्णाने तिच्या आयुष्यात एक व्यक्ती असल्याची कबुली दिली होती. मी ज्याच्यासोबत आहे, आनंदी आहे. मला काहीही लपवण्याची गरज नाही, असे ती म्हणाली होती. यानंतर सोशल मीडियावर एबनसोबतचे अनेक फोटो तिने शेअर केले होते.
25 वर्षांची कृष्णा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. ती नेहमीच आपल्या मित्रांसोबत पार्टी करताना दिसते. नेहमी स्टनिंग लूकमध्ये दिसणारी कृष्णा आपल्या भावाप्रमाणे दबंग आहे. टायगर वडिलांच्या पाउलावर पाऊल ठेवत फिल्म इंडस्ट्रीमध्ये आला. त्याने अॅक्शन स्टार म्हणून स्वत:ची वेगळी ओळख बनवली. पण जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा मात्र कायम पडद्यामागे राहणे पसंत करते. असे म्हणतात की, करण जोहरने 2012 मध्ये ‘स्टुडंट आॅफ इअर’साठी कृष्णाला आॅफर दिली होती. पण कृष्णाने ही आॅफर नाकारली आणि ही भूमिका नंतर आलिया भटच्या पदरात पडली. कृष्णाला टॅटू काढण्याचा छंद आहे. शरीराच्या अनेक भागांवर तिने टॅटू गोंदवले आहेत.