Tiger Video Controversy: वाघाजवळ जाऊन केलेल्या व्हिडीओ शूटवर रवीना टंडनचं स्पष्टीकरण; म्हणाली..
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 11:22 AM2022-12-01T11:22:14+5:302022-12-01T11:23:00+5:30
Raveena Tandon : अभिनेत्री रवीना टंडन सध्या वादात सापडली आहे. खरंतर, रवीनाने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये ती मध्य प्रदेशातील सातपुडा व्याघ्र प्रकल्पात सफारीचा आनंद लुटताना दिसली होती.
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) सध्या वादात सापडली आहे. खरं तर, रवीनाने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये ती मध्य प्रदेशातील सातपुडा व्याघ्र प्रकल्पात सफारीचा आनंद लुटताना दिसली होती. सफारीदरम्यान त्यांची जीप वाघाच्या अगदी जवळ दिसते. यावरून वाद निर्माण झाला. मात्र, आता रवीनाने यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याचवेळी, तिने आपल्या खुलाशात म्हटले आहे की, ती ज्या वाहनातून प्रवास करत होती ते वनविभागाचे परवानाधारक वाहन होते आणि तिच्यासोबत गाईड आणि चालकही उपस्थित होते.
रवीना टंडनने तिच्या पहिल्या ट्विटमध्ये, एका न्यूज चॅनलच्या रिपोर्टची क्लिप शेअर केली आणि त्याला कॅप्शन दिले, "डेप्युटी रेंजरच्या मोटरसायकलजवळ वाघ आला होता. टायगर कधी आणि कशी प्रतिक्रिया देईल हे कोणीही सांगू शकत नाही. हे वनविभागाचे परवानाधारक वाहन असून, त्यांचा मार्गदर्शक व चालक सोबत आहे. जे इतके प्रशिक्षित आहेत की त्यांना सीमा आणि कायदा माहित आहे.
#satpuratigerreserve .@News18MP reports.A tiger gets close to the deputy rangers bike. One can never predict when and how tigers will react. It’s the Forest Department licensed vehicle,with their guides and drivers who are trained to know their boundaries and legalities. pic.twitter.com/mTuGLSVPER
— Raveena Tandon (@TandonRaveena) November 29, 2022
रवीना टंडनने तिच्या दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिले की, जिथे वाघ फिरतात, तिथे राजे असतात. आम्ही त्यांना शांतपणे पाहतो. अचानक होणारी कोणतीही हालचाल त्यांना घाबरवू शकते. रवीनाने तिसऱ्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे की आम्ही अचानक कोणतीही कारवाई केली नाही, पण शांत बसलो आणि वाघिणीला पुढे जाताना पाहिले.'
रवीना टंडनने तिच्या पुढील ट्विटमध्ये लिहिले की, “आम्ही पर्यटनाच्या मार्गावर होतो, ज्याला वाघ अनेकदा ओलांडतात. या व्हिडीओमध्ये दिसणारी वाघीण केटीलाही वाहनांजवळ येऊन गुरगुरण्याची सवय आहे. लोक रवीनाच्या या ट्विटला लाईक आणि रिट्विट करत असून तिला पाठिंबा देत आहेत.