'लोकमान्य' मालिकेच्या निमित्ताने टिळकांच्या १०० फुटी बँनरच अनावरण !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 02:33 PM2022-12-17T14:33:19+5:302022-12-17T14:34:28+5:30

Lokmanya Serial : टिळकांच्या राजकीय प्रवासाबरोबरच त्यांच्या कौटुंबिक आयुष्यातील महत्त्वाचे घटना-प्रसंग लोकमान्य मालिकेत पहायला मिळणार आहेत.

Tilak's 100 feet banner unveiled on the occasion of 'Lokmanya' series! | 'लोकमान्य' मालिकेच्या निमित्ताने टिळकांच्या १०० फुटी बँनरच अनावरण !

'लोकमान्य' मालिकेच्या निमित्ताने टिळकांच्या १०० फुटी बँनरच अनावरण !

googlenewsNext

लोकमान्यांचं असामान्य व्यक्तिमत्त्व राजकीय, सामाजिक आणि कौंटुंबिक स्तरावर त्या काळात कसं घडलं, हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्व अबालवृद्धांना आजही आहे. आपलं म्हणणं प्रभावीपणे मांडता येण्याच्या कसोटी काळात सध्या आपण आहोत. टिळकांसारखी प्रभावी वक्तृत्त्वशैली आपल्याकडेही असावी, असे वाटण्याचा हा काळ आहे, म्हणून आजच्या काळाला साजेशा लोकमान्य टिळकांची चरित्रगाथा लोकमान्य या मालिकेतून झी मराठी वाहिनी प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. २१ डिसेंबरपासून बुधवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता ‘लोकमान्य’ (Lokmanya Serial) ही चरित्रगाथा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेच्या निमित्ताने प्रसिद्धीसाठी १०० फुटी बँनरचं अनावरण करण्यात आले.

नवीन मालिका सुरू होते आहे, हे इंनोवेटिव्ह पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी झी मराठीने १६ डिसेंबर या दिवशी भिवंडीतील एका नावाजलेल्या एका फ्लाईंग रेस्टॉरंटमध्ये मालिकेच्या १०० फूट पोस्टरचे अनावरण केले. झी मराठी वाहिनी नेहमीच वेगवेगळे प्रयत्न करत असते, मग मालिकेद्वारे वेगळे विषय हाताळणे असो किंवा नवीन प्रयोग असो झी मराठी या प्रत्येक बाबतीत आघाडीवर आहे. मालिकांच्या लाँच आधी प्रेक्षकांसोबत भव्य प्रीमियर ही संकल्पना पण झी मराठीने सुरु केली.


टिळकांच्या राजकीय प्रवासाबरोबरच त्यांच्या कौटुंबिक आयुष्यातील महत्त्वाचे घटना-प्रसंग या मालिकेत पहायला मिळणार आहेत. टिळकांचा विवाह, त्यांचे महाविद्यालयीन जीवन, त्यांचे विविधांगी लेखन, राजकीय स्तरावरील त्यांच्या कारकिर्दीचे महत्त्वपूर्ण टप्पे या मालिकेतून प्रेक्षकांना पहायला मिळतील. ते जहाल विचारांचे थोर भारतीय नेते होते.

लोकमान्य ही नवीन मालिका २१ डिसेंबरपासून बुधवार ते शनिवार रात्री ९:३० वा. पाहायला मिळणार आहे. अशा प्रकारे भव्य पोस्टरचे अनावरण करून झी मराठीने आपले वेगळेपण कायम राखले.

Web Title: Tilak's 100 feet banner unveiled on the occasion of 'Lokmanya' series!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.