कधीकाळी 3 रुपयांसाठी 24 तास काम करायचे नट्टू काका, वेळ अशी बददलली की आता आहेत कमाईचा आकडा पाहून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 02:22 PM2021-07-31T14:22:26+5:302021-07-31T14:31:31+5:30
तारक मेहता मालिकेत नट्टू काकांच्या आयुष्य खर्यां अर्थाने पालटले. या मालिकेने त्यांना नुसती ओळखच नाही दिली तर पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा सगळे काही मिळवून दिले.
सर्वात लोकप्रिय मालिका म्हटले तर 'तारक मेहता का उल्टा चष्मा' याच मालिकेचे नाव डोळ्यासमोर येते. गेल्या १३ वर्षापासून मालिका रसिकांचे भरघोस मनोरंजन करत आहे. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सा-यांची ही आवडती मालिका आहे. मालिकेप्रमाणेच मालिकेतले कलाकारही तितकेच रसिकांचे आवडते कलाकार बनले आहेत. जेठालालपासून ते चंपकचाचा, टप्पू सेना भिडे मास्टर सगळेच या मालिकेमुळे लोकप्रिय बनले आहेत. या मालिकेत बागासोबत सतत दिसणारे नट्टू काकाचीही लोकप्रियता कमी नाही. या मालिकेमुनेच नट्टू काका यांना त्यांच्या आयुष्यात मोठा आधार दिला. घनश्याम नायक असे त्याचे खरे नाव असले तरी नट्टू काका म्हणूनच त्यांना आज ओळखले जाते.या मालिकेआधी 350 हून अधिक टीव्ही मालिकांमध्ये तर ३१ सिनेमांत काम केले आहे.
नट्टू काकांनाही संघर्ष हा काही चुकला नाही. इंडस्ट्रीत कामकरण्यास सुरुवात केली तेव्हा अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागला होता. त्यावेळी मिळणारे तुटुपुंजा मानधनत त्यांना त्यांचा संसाराचा गाडा चालवावाव लागायचा. एक वेळ अशीही होती की, केवळ 3 रुपयांसाठी 24 तास काम करावे लागत होते. इंडस्ट्रीमध्ये जास्त मानधन तेव्हा मिळायचे नाही. अशा परिस्थिती मुलांच्या शाळेची फी आणि घरभाडे भरण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नसायचे अशावेळी कधी शेजार्यांकडून तर कधी मित्रांकडून पैसे उधार घ्यावे लागत असल्याचे मुलाखतीत त्यांनी सांगितले होते.
तारक मेहता मालिकेत नट्टू काकांच्या आयुष्य खर्यां अर्थाने पालटले. या मालिकेने त्यांना नुसती ओळखच नाही दिली तर पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा सगळे काही मिळवून दिले. तुटपुंज्या मानधनात काम करणारे नट्टू काकाला याच मालिकेने आर्थिक दृष्ट्याही प्रबळ बनवले. मायानगरी मुंबईत आज त्यांचे स्वतःच्या मालकीचे दोन फ्लॅट आहेत.लॉकडाऊनमध्येही त्यांचे मानधन थांबले नाही.
यासाठी मालिकेचे निर्माते असित मोदी यांचेही करावे तितके कौतुक कमीच. जेव्हा इतर कलाकार आर्थिक अडचणीत होते तेव्हा तारक मेहताचा एकाही कलाकाराला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला आहे. याच कारणामुळे कलाकार इतक्यावर्षानंतरही मालिकेत काम करताना दिसतात.