'मिस्टर इंडिया'मधील बालकलाकार टीना आठवते का? आता दिसते प्रचंड ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 05:30 PM2021-12-19T17:30:00+5:302021-12-19T17:30:00+5:30

Mr. India Movie: या चित्रपटात अनिल कपूरसोबत काही बालकलाकारही झळकले होते. त्यातच टीना ही चिमुकली विशेष लक्षवेधी ठरली होती.

tina the child actor in the movie mr india is now very big looks very beautiful and bold | 'मिस्टर इंडिया'मधील बालकलाकार टीना आठवते का? आता दिसते प्रचंड ग्लॅमरस

'मिस्टर इंडिया'मधील बालकलाकार टीना आठवते का? आता दिसते प्रचंड ग्लॅमरस

googlenewsNext

१९८७ साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेला 'मिस्टर इंडिया' (mr india) चित्रपट आठवतोय? अनिल कपूर (anil kapoor) आणि श्रीदेवी (shridevi) यांची या चित्रपटात मुख्य भूमिका होती. हा चित्रपट त्या काळी तुफान गाजला होता. इतकंच कशाला तर आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. त्यामुळे अनेकदा प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची चर्चा रंगते. या चित्रपटात अनिल कपूरसोबत काही बालकलाकारही झळकले होते. त्यातच टीना ही चिमुकली विशेष लक्षवेधी ठरली होती. त्यामुळेच ही चिमुकली आता काय करते? कशी दिसते? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडतात. म्हणूनच, टीना ही भूमिका साकारणारी बालकलाकार आता काय करते याविषयी जाणून घेऊयात.

'मिस्टर इंडिया' या चित्रपटात टीन ही भूमिका बालकलाकार हुजान खादाइजी हिने साकारली होती. परंतु, या चित्रपटानंतर हुजानचा कलाविश्वातील वावर कमी झाला. म्हणूनच, आता हुजान नेमकं काय करते हा प्रश्न नेटकऱ्यांना पडतो. 

हुजान आज कलाविश्वापासून दूर आहे. मात्र, सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं. हुजान इन्स्टाग्रामवर अनेकदा तिचे आणि तिच्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असते. हुजान ही ४० वर्षांची असून ती दोन मुलांची आई असल्याचं सांगण्यात येतं.  तसंच कलाविश्वाला रामराम करणारी हुजानने उच्च शिक्षण घेतलं आहे. सध्या आज एका जाहिरात कंपनीत काम करते. 

दरम्यान, मिस्टर इंडिया चित्रपटानंतर हुजान कोणत्याही चित्रपटात झळकली नाही. परंतु, ती सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असून तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

Web Title: tina the child actor in the movie mr india is now very big looks very beautiful and bold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.