वर्णभेदी टिप्पणीमुळे तनिष्ठा थेट कार्यक्रमातून पडली बाहेर
By Admin | Published: September 28, 2016 05:13 PM2016-09-28T17:13:16+5:302016-09-28T17:13:16+5:30
मी त्या कार्यक्रमामध्ये माझ्यावर विनोद करतील म्हणूनच गेले होते. खरतर मी वाट पाहत होते माझ्यावर कधी विनोद करतील. परंतू त्यांनी माझ्यावर नाही तर...
tyle="text-align: justify;"> प्रियांका लोंढे, ऑनलाइन लोकमत
कॉमेडी नाईट्स बचाओ या कार्यक्रमामध्ये अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जीला तिच्या वर्णावरून टिप्पणी ऐकावी लागली आहे. त्यावर काही बोलण्याऐवजी ती थेट शो सोडुन निघून गेली. मला माझ्यासाठी नाही तर या लोकांविषयी वाईट वाटते, जे अजूनही वर्णभेदावर बोलतात. विनोद करणाºया लोकांची मानसिकता बदलायला हवी अशी प्रतिक्रिया तनिष्ठाने लोकमत सीएनएक्सशी बोलताना दिली. तसेच याविषयी मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींना काय वाटते आपण जाणुन घेऊयात.
तनिष्ठा चॅटर्जी : मी त्या कार्यक्रमामध्ये माझ्यावर विनोद करतील म्हणूनच गेले होते. खरतर मी वाट पाहत होते माझ्यावर कधी विनोद करतील. परंतू त्यांनी माझ्यावर नाही तर वर्णभेदावर विनोद केला आहे. ही माझी वैयक्तिक गोष्ट नाही हे सर्वांनी समजुन घ्यायला हवे. एकविसाव्या शतकातही वर्णभेदावर विनोद केले जातात हे दुर्देवी आहे. मी तिथून निघाल्यावर मला सांगण्यात आले की तुम्ही जाऊ नका, आपण तो विनोद कट करू असे मला सांगण्यात आले मला मात्र ते मान्य नव्हते. मला सोशलसाईट्सवर अनेक प्रतिक्रिया आल्या. काही फोन आले की, तू राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री आहेस या गोष्टींना सोडून दे. पण मला या सर्वांना एकच सांगायचय, ही माझी वैयक्तिक गोष्ट नाही. मला फक्त एवढेच वाटते आहे की, तुम्ही विचारांमध्ये बदल करणे गरजेच आहे.
वीणा जामकर : कोणत्याही व्यक्तीला त्याच्या रंगावरून कधीच हिणवू नये. माणूस कसा दिसतो याच्यापेक्षा तो काय काम करतो हे जास्त महत्वाचे आहे. एखाद्याला त्याच्या व्यक्तिमत्वावरून बोलल्याने त्याच्यातील आत्मविश्वासाला तडा जाऊ शकतो. एखाद्याला त्याच्या वर्णभेदावरुन बोलणे अत्यंत चुकीचे आहे. प्रत्येक व्यक्ती तिच्यामध्ये असलेल्या गुणांमुळे यशस्वी होत असते. तनिष्ठा ही अत्यंत चांगली अभिनेत्री आहे हे सार्वंनाच माहिती आहे. त्यामुळे कोणत्याही कॉमेडी शोजमध्ये विनोद करताना थोडी मर्यादा पाळण्याची गरज आहे.
क्रांती रेडकर : परदेशात मोठ-मोठे कलाकार अगदी आनंदाने अशा प्रकारच्या कॉमेडी शोज मध्ये सहभागी होतात. एवढेच नाही तर त्यांच्यावर केलेला कोणताही विनोद ते मजेत स्विकारतात. परंतू आपल्याकडे लोक विनोद पचवू शकत नाहीत. आपल्याकडच्या लोकांची मानसिकता थोडी वेगळी आहे. शिवाय तत्व आणि मुल्य आपल्यकडे जास्त जपली जातात. त्यामुळे आपल्याकडे जर कॉमेडी शोज होत असतील तर काही मर्यादा पाळाव्या लागतील. परंतू जर कलाकारांना विनोद सहन होत नसतील तर त्यांनी अशा कार्यक्रमांमध्ये जाणे टाळावे.
पुजा सावंत : कॉमेडी कार्यक्रमात जर मर्यादा सोडुन एखाद्या व्यक्तीवर विनोद केले जात असतील तर ती गोष्ट खरच चुकीची आहे. आज आम्हाला देखील अशा गोष्टींना सतत सामोरे जावे लागते. सोशल साईट्सवर एखादा फोटो अपलोड केला तरी त्यावर अतिशय वाईट कमेंट्स केल्या जातात. लोकांना त्यांची मते व्यक्त करण्याचा अधिकार आहे. मी त्यांच्या मतांचा आदर करते. परंतू एखाद्याच्या सहन शक्तीपलिकडे जाईल असे विनोद करू नयेत. कोणाचीही टिंगल करताना थोड जपुन बोलले पाहिजे.
प्रार्थना बेहेरे : एखाद्या व्यक्तीवर जर आपण विनोद करून हसू शकत असु, तर आपल्यावर झालेले विनोद पचवण्याचीही हिमत आपल्यात असायला हवी.
कॉमेडी शोजमध्ये काय आणि कशाप्रकारचे विनोद करतील हे सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही मला चिडवू नका असे सांगुन चालत नाही. मला देखील एका मराठी विनोदी कार्यक्रमामध्ये तु घोड्यासारखी किंकाळून हसतेस अशी कमेंट मिळाली. पण म्हणून काय मी तो शो सोडून गेले नाही. त्यामुळे कलाकारांना त्यांचे स्टारडम जपताना चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी सांभाळता आल्या पाहिजेत.