आज प्रसिद्ध अभिनेते राजेन्द्र कुमार यांचा जन्मदिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2016 06:27 PM2016-07-20T18:27:05+5:302016-07-20T18:27:35+5:30

मा. राजेंद्र कुमार यांनी १९५० साली जोगन या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात त्यांनी दिलीप कुमार आणि नर्गिस यांच्या बरोबर अभिनय केला.१९५७ साली मदर इंडिया

Today, the birthday of famous actor Rajendra Kumar | आज प्रसिद्ध अभिनेते राजेन्द्र कुमार यांचा जन्मदिवस

आज प्रसिद्ध अभिनेते राजेन्द्र कुमार यांचा जन्मदिवस

googlenewsNext

- संजीव वेलणकर, पुणे.

अभिनेते राजेन्द्र कुमार
जन्म:- २० जुलै १९२९
मा. राजेंद्र कुमार यांनी १९५० साली जोगन या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात त्यांनी दिलीप कुमार आणि नर्गिस यांच्या बरोबर अभिनय केला.१९५७ साली मदर इंडिया मध्ये नर्गिसचा मुलगा म्हणून काम केले.१९५९ साली आलेल्या गूँज उठी शहनाई मध्ये त्यांनी मुख्य अभिनेता म्हणून केली. तसा मा.राजेंद्रकुमार म्हणजे म्हटला तर स्टार, म्हटला तर नट तरी पण ६० च्या दशकात त्यांचे अनेक चित्रपट सिल्वर जुबली झाले. या मुळे त्यांचे नाव 'ज्युबिली कुमार' म्हणून पडले. त्यांनी अनेक सुंदर चित्रपटात कामे केली. दीं जैसे धूल का फूल, दिल एक मंदिर, मेरे महबूब, संगम, आरज़ू, प्यार का सागर, गहरा दाग़, सूरज, तलाश अशी अनेक नावे देता येतील. त्यांना सर्वश्रेष्ठ अभिनेता म्हणून फ़िल्मफ़ेयर पुरस्कार दिल एक मंदिर, आई मिलन की बेला और आरज़ू या चित्रपटासाठी मिळाले व सह अभिनेता म्हणून संगम साठी.
आपला मुलगा कुमार गौरव यासाठी लव स्टोरी चित्रपट बनवला, या चित्रपटाचे निर्माता-निर्देशक मा.राजेन्द्र कुमारच होते. मा.राजेन्द्र कुमार यांचे १२ जुलै १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे मा.राजेन्द्र कुमार यांना आदरांजली.

मा.राजेन्द्र कुमार यांची काही गाणी ...
ये मेराप्रेम पत्र पढकर
मेरे मेहबूब
तेरे प्यार का आसरा चाहता हु
चेहरे पे

Web Title: Today, the birthday of famous actor Rajendra Kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.