गीतकार आणि शायर शकील बदायूँनी यांचा आज जन्मदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2016 01:37 PM2016-08-03T13:37:18+5:302016-08-03T13:37:18+5:30

शकील शब्दाचा अर्थच आहे, हॅन्डसम, रुबाबदार. शकील बदायूँनी तसेच होते आणि त्यांचे कपडेही त्या शब्दाला साजेसे असत. कधीही चकचकीत बूट व टायची गाठ बांधल्याशिवाय ते घराबाहेर पडत नसत.

Today's Birthday to Lyricist and Shire Shakeel Badayuni | गीतकार आणि शायर शकील बदायूँनी यांचा आज जन्मदिन

गीतकार आणि शायर शकील बदायूँनी यांचा आज जन्मदिन

googlenewsNext
>- संजीव वेलणकर
 
शकील शब्दाचा अर्थच आहे, हॅन्डसम, रुबाबदार. शकील बदायूँनी तसेच होते आणि त्यांचे कपडेही त्या शब्दाला साजेसे असत. कधीही चकचकीत बूट व टायची गाठ बांधल्याशिवाय ते घराबाहेर पडत नसत. 
 
वडील जमाल अहमद सोख्ता ‘काद्री’ हे शायर आणि काका जिया उल काद्री हे तर दाग-मोमीनच्या काळातले समीक्षक. नुसते समीक्षक नव्हे, तर ‘नातगो’ शायर. (‘नात’ म्हणजे हजरत महंमद यांचे प्रशंसागीत.ते लिहिणारा कवी).
 
वडिलांनी या ‘नन्ना मुन्ना राही’ शकीलला अरबी, फार्सी, ऊदरू, हिंदी सगळ्या भाषा शिकण्यासाठी मौलवी अब्दुल गफार, मौलवी अब्दुल रहमान, बाबू रामचंद्र या त्यावेळच्या ज्ञानवंतांना पाचारण केले होते. त्यातूनच पुढे शकील ज्या अलीगढ विद्यापीठात (१९३७ मध्ये) गेले, तेथे अहसन मारहरवीसारखे प्राध्यापक शिकवायला आणि मजाजसारखे सहाध्यायी होते. शायरीचे काही धडे त्यांनी प्रथम काकांकडे, नंतर जिगर मुरादाबादींकडे गिरविले. काळाप्रमाणे राग बदलावा, हे शकील यांना चांगलेच समजत होते.
कॉलेजमध्ये असतानाच ते कविसंमेलनात गाजत होते. रुबाबदार शकीलजींना गळाही तितकाच गोड लाभला होता. एका कविसंमेलनात दस्तूरखुद्द नौशाद उपस्थित होते. त्यांनी मुंबईचे निमंत्रण दिले आणि ‘झुले मे पवन के आई बहार’ असेच झाले. शकील अहमदचे नाव भारतात चित्रपटाद्वारे ‘शकील बदायूँनी’ म्हणून झगमगू लागले. ‘दर्द’ हा त्यांचा पहिला चित्रपट आणि त्यांनी लिहिलेले ‘अफसाना लिख रही हूँ’ गाणार्याग उमादेवी ऊर्फ टुणटुणचाही पहिलाच चित्रपट होता. शकील यांचा चित्रपटसृष्टीतील एक विक्रम आजही तसाच आहे. तो म्हणजे १९६१ ते ६३ सलग तीन वर्षे फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाला.
 
२० एप्रिल १९७० रोजी  शकील बदायूँनी यांचे निधन झाले.
 
शकील बदायूँनी यांनी लिहलेली काही गाणी 
 
दिले बेताब 
आपके पहले मे पहेलु मे 
चौदहवी का चाँद हो 
हुस्नवाले तेरा जबाब नही 
कहीं दीप जले कही दिल 
मुझे इश्क हे तुझीसे
 
शकील बदायूँनी यांचे शेर
 
है यही वक्ते-अमल जहदे-मुसलसल की कसम
बेसहारों की तरह हाथ न मलते रहना
नग्मा-ए-इश्क न हो एक ही धुन पर कायम
वक्त के साथ जरा राग बदलते रहना
(निरंतर संघर्षाची शपथ घेऊन घेऊन सांगतो, हीच काम करण्याची वेळ आहे. उगीचच निराधारांसारखे हात मळत बसू नकोस. प्रेमाचे गीत एकाच सूरगतीवर ठेवू नकोस. काळाप्रमाणे रागही बदलत राहा.) 
 
बदले-बदले मेरे गमख्वार नजर आते है
मरहले इश्क के दुश्वाेर नजर आते है
(माझ्यावर सहानुभूती दाखविणारा प्रियकर बदललेला दिसतोय. आता प्रेमाचा मार्ग अधिकच कठीण झालेला दिसतो.)
 
बदले-बदले मेरे सरकार नजर आते है
घर की बरबादी के आसार नजर आते है 
(चित्रपट : चौदहवी का चाँद)
(माझा प्रियतम बदलल्यासारखा वाटतोय. घराची बरबादी सुरू झाल्याची लक्षणं दिसू लागलीत) 
 
कोई ऐ ‘शकील’ देखे ये जुनूँ नही तो और क्या है
कि उसीके हो गये हम जो न हो सका हमारा

Web Title: Today's Birthday to Lyricist and Shire Shakeel Badayuni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.