Sai Dharam Tej Accident: टॉलिवूड अभिनेता साई धरम तेजच्या स्पोर्ट्स बाईकचा अपघात, अभिनेता गंभीर जखमी; CCTV फुटेज आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 08:57 AM2021-09-11T08:57:58+5:302021-09-11T08:58:35+5:30
Sai Dharam Tej Accident : टॉलीवूड अभिनेता साई धरम तेज शुक्रवारी एका रस्ते अपघतात गंभीर जखमी झाला आहे.
Sai Dharam Tej Accident : टॉलीवूड अभिनेता साई धरम तेज शुक्रवारी एका रस्ते अपघतात गंभीर जखमी झाला आहे. साई धरम तेज त्याच्या १८ लाखांच्या आणि तब्बल ११६० स्पोर्ट्स बाईकवर जात होता. तेव्हा अचानक त्याची बाईक घसरली आणि साई धरम तेज गंभीर जखमी झाला. त्याला बेशुद्ध अवस्थेत मेडिकओव्हर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार सध्या तो धोक्याबाहेर आहे. पण त्याच्या डोळ्याजवळ, छातीवर आणि पोटावर जखम झाली आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. (Tollywood actor Sai Dharam Tej injured in road accident condition out of danger said by Apollo Hospital Press Statement)
#SaiDharamTej Accident Spot Cc footage pic.twitter.com/89vmhVksNI
— DONTHU RAMESH (@DonthuRamesh) September 10, 2021
मेडिकोव्हर रुग्णालयातून त्याला आता अपोलो रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तिथंच त्याच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. सध्या तो व्हेंडिलेटरवर असून पुढील ४८ तास तो डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली असणार आहे.
@IamSaiDharamTej met with an accident few hours ago & has suffered minor injuries & bruises.
— Chiranjeevi Konidela (@KChiruTweets) September 10, 2021
Wish to share with All Fans & Well Wishers that There is absolutely NO cause for Concern or Anxiety.He is recovering under expert medical supervision & shall be back in a couple of days. pic.twitter.com/JnuZqx8aZT
अनेक तेलुगू अभिनेत्यांनी घेतली धाव
साई तेज याचा अपघात झाल्याची माहिती मिळताच अभिनेते चिरंजीवी तात्काळ रुग्णालयात पोहोचले. धरम तेज हा अभिनेते चिरंजीवी यांचा नातेवाईक आहे. चिरंजीवी यांच्यासोबतच पवन कल्याण, अल्लू अरविंद, नागाबाबू यांनी रुग्णालयात जाऊन साई तेज याच्या प्रकृतीची विचारपूस केली. अभिनेते चिरंजीवी यांनीही त्यांच्या ट्विटरच्या माध्यमातून अभिनेता साई धरम तेज यांच्या प्रकृतीबाबतचे अपोलो रुग्णालयाचे पत्रक ट्विट केले असून त्याच्या सर्व चाहत्यांना साई धरम तेज सुखरुप असल्याचे कळवले आहेत. तसंच चाहत्यांकडून सुरू असलेल्या प्राथर्नचे आभार व्यक्त केले आहेत.