CoronaVirus : गुडन्यूज हॉलिवूडच्या अभिनेत्याचा पूर्णपणे बरा झाला कोरोना, हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 02:03 PM2020-03-17T14:03:59+5:302020-03-17T14:12:19+5:30

जगभरातील त्याच्या फँन्सनी चिंता व्यक्त केली होती. 

Tom hanks and his wife rita wilson released from hospital after coronavirus quarantine gda | CoronaVirus : गुडन्यूज हॉलिवूडच्या अभिनेत्याचा पूर्णपणे बरा झाला कोरोना, हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज

CoronaVirus : गुडन्यूज हॉलिवूडच्या अभिनेत्याचा पूर्णपणे बरा झाला कोरोना, हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज

googlenewsNext

जगभरात कोरोना व्हायरसचं सावट असल्यामुळे भीतीचं वातावरण आहे. भारतात आतापर्यंत कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या 134 पर्यंत पोहचली आहे. हॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते टॉम हँक्स आणि त्यांची पत्नी रिटा विल्सन यांची कोरोना चाचणी काही दिवसांपूर्वी पॉझिटीव्ह आली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. टॉम आणि रिटा  हे आता बरे झाले आहेत. हॉस्पिटलमधून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. टॉपने ट्विटरच्या माध्यमातून तू पूर्णपणे बरा झाला असल्याचे सांगितले. त्याने या दरम्यान मदत केलेल्या सगळ्यांचे आभार मानले आहेत.तसेच एकमेकांची काळजी घेत मदत करण्याचे आवाहन देखील त्याने केले आहे.

टॉम हँक्सची कोरोनाची टेस्ट पॉझिटीव्ह आल्यावर जगभरातील त्याच्या फँन्सनी चिंता व्यक्त केली होती. टॉम आणि रिटा दोघेही शूटींगसाठी ऑस्ट्रेलियाला गेले होते. ऑस्ट्रेलियाहून परत आल्यानंतर त्यांना ताप, सर्दी ही लक्षणे दिसू लागली. त्यांनी कोरोनाची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर टेस्ट पॉझिटीव्ह आली होती.


टॉम हँक्स यांनी अनेक हॉलिवूड सिनेमांमध्ये काम केले. कास्ट अवे, फॉरेस्ट गम्प, कॅच मी इफ यू कॅन, द टर्मिनल असे त्यांचे अनेक चित्रपट गाजलेत. त्यांना दोन वेळा आॅस्कर हा मानाचा पुरस्कारही मिळाला होता.
टॉम एक महान अभिनेते आहेत. टॉम यांचाच ‘फॉरेस्ट गम्प’ या सिनेमाचा बॉलिवूड रिमेक येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ या नावाने आमिर खान हा रिमेक बनवत आहे.

Web Title: Tom hanks and his wife rita wilson released from hospital after coronavirus quarantine gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.