Tony Kakkar: 'तुझं गाणं ऐकण्यापेक्षा विष पिऊन मरण पत्करेन', नेटिझनच्या कमेंटवर गायक टोनी कक्कर काय म्हणाला वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 12:04 PM2021-09-11T12:04:17+5:302021-09-11T12:05:41+5:30
Tony Kakkar: गायक टोनी कक्कर याचं 'कांटा लगा' हे नवं गाणं नुकतच प्रदर्शित झालं आहे. यात गायक नेहा कक्करचा देखील समावेश आहे.
Tony Kakkar: गायक टोनी कक्कर याचं 'कांटा लगा' हे नवं गाणं नुकतच प्रदर्शित झालं आहे. यात गायक नेहा कक्करचा देखील समावेश आहे. पण या गाण्यावरुन सोशल मीडियात टोनी कक्कर याला ट्रोलिंगला सामोरं जावं लागत आहेत. एका यूझरनं तर टोनी कक्कर याला तुझं गाणं ऐकण्यापेक्षा विष पिऊन मरण पत्करेन अशी प्रतिक्रिया दिली. टोनी कक्करनं यूझरच्या प्रतिक्रियेकडे दुर्लक्ष न करता यावेळी थेट प्रत्युत्तर दिलं आहे.
टोनी कक्कर याला टॅग करत एका यूझरनं टोनीच्या नव्या गाण्याबाबत कमेंट केली होती. "सर, तुमचं गाणं ऐकण्यापेक्षा मी विष पिऊन मरण पत्करेन'', असं ट्विट एका यूझरनं केलं. त्यावर टोनी कक्कर यानं जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. "तू असं अजिबात करू नकोस. माझं गाणं कधीच ऐकू नकोस. कारण आपलं जीवन खूप मौल्यवान आहे. असे १०० टोनी कक्कर येतील आणि जातील. माझं आयुष्य तुला लागो अशी मी प्रार्थना करतो", असा उपरोधिक टोला टोनी कक्कर यांनी ट्रोलरला हाणला आहे.