आयुष्मान खुरानाने 'या' पाच हिंदी चित्रपटामुळे गाठले यशाचे शिखर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 01:31 PM2023-09-14T13:31:49+5:302023-09-14T13:40:57+5:30

आपण आयुष्मान खुरानाचे असे पाच चित्रपट पाहूया, ज्यामुळे त्याने यशाचे शिखर गाठले. 

Top 5 Movies of Ayushmann Khurrana | आयुष्मान खुरानाने 'या' पाच हिंदी चित्रपटामुळे गाठले यशाचे शिखर

Ayushman Khurana

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना आज ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. आयुष्यमान खुराना नेहमीच त्याच्या अनोख्या आणि हटके भूमिकांसाठी ओळखला जातो.  आयुष्मान खुरानाचा जन्म १४ सप्टेंबर १९८४ मध्ये चंदीगडमध्ये झाला होता. आयुष्मान हा अभिनेता, गायक असण्यासोबतच तो व्हिडिओ जॉकी आणि अँकर देखील आहे.

आयुष्मानने 2012 साली विकी डोनर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.  दशकभराच्या कारकिर्दीत आयुष्मानचे अनेक चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले तर काही फ्लॉप झाले. आपल्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांना हसवले तर कधी सामाजिक संदेश देऊन मने जिंकली. बॉलिवूडमध्ये स्टार बनणे आयुष्मानसाठी कधीच सोपे नव्हते. त्याने अनेक चढउतार पाहिले आहेत. आज आपण आयुष्मान खुरानाचे असे पाच चित्रपट पाहूया, ज्यामुळे त्याने यशाचे शिखर गाठले. 


विकी डोनर


विकी डोनर हा २०१२ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट. चित्रपटात स्पर्म डोनेशनसारख्या सेंसिटिव्ह विषयाला हलक्याफुलक्या पद्धतीने सादर करण्यात आले होते. इमोशनल टच असलेल्या या सिनेमात पंजाबी कल्चर आणि दिल्लीच्या राहणीमानाला योग्य पद्धतीने सादर करण्यात आले. विकी डोनरची प्रेक्षक व समीक्षकांकडून प्रचंड प्रशंसा झाली होती. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपरहिट झाला होता. या चित्रपटामुळे आयुष्मानच्या करिअरला नवे वळण मिळाले होते. या चित्रपटानंतर त्याच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली होती. तसेच त्याला अनेक पुरस्कारही मिळाले होते. 


बधाई हो 

आयुष्यमान खुरानाचा 'बधाई हो' हा चित्रपट ब्लॉकब्लस्टर ठरला होता. प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरुन प्रेम दिलं होतं. दोन मोठी मूले असलेल्या ज्येष्ठ जोडप्याच्या अनपेक्षित गरोदरपणाच्या कथेवर आधारीत हा चित्रपट होता. या चित्रपटानंतर आयुष्मानच्या करिअरचा ग्राफ अधिकाधिक उंचावतच गेला. 

 दम लगा के हईशा

दम लगा के हईशा हा आयुष्मान खुरानाचा आणखी एक यशस्वी चित्रपट. हा चित्रपट 27 फेब्रुवारी 2015 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे कथानक हे एका छोट्या जिल्ह्यातील दोघांच्या आयुष्याभोवती फिरते. ही जोडी आणि त्यांची कथा प्रेक्षकांना खूप आवडली होती. शिवाय या चित्रपटातील गाणेही हीट झाली होती. या चित्रपटानंतर आयुष्मानच्या करिअरची गाडी सूसाट निघाली. 

शुभ मंगल सावधान

आयुष्यमान जो ही सिनेमा हाती घेतो, त्याची कथा ही नेहमी हटके असते. असाच एक हटके चित्रपट म्हणजे शुभ मंगल सावधान हा आहे. "शुभ मंगल सावधान"ने इरेक्टाइल डिसफंक्शनचा विषय धैर्याने हाताळला. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.


ड्रीम गर्ल
ड्रीम गर्ल हा प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा चित्रपट. ‘ड्रिम गर्ल’ मध्ये करमवीर नामक तरूणाचे पात्र  आयुष्यमानने साकारले होते. मुलीच्या आवाजात ग्राहकांशी बोलणं हे करमवीरचं काम होतं.  आयुष्मानने अप्रतिमरित्या आपल्या बोलण्यातून आणि बॉडी लँग्वेजमधून प्रेक्षकांची मनं जिकंली.  

Web Title: Top 5 Movies of Ayushmann Khurrana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.