Miss Universe 2021: हरनाजच्या यशात ‘या’ मराठमोळ्या ट्रान्सवुमनचा वाटा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 01:00 PM2021-12-15T13:00:00+5:302021-12-15T13:00:00+5:30
Miss Universe 2021:मिस युनिव्हर्स आणि हरनाज यांच्याशी निगडीत काही गोष्टी समोर येत आहेत. त्यातच एका मराठमोळ्या ट्रान्सवुमनमुळे हरनाज मिस युनिव्हर्सपर्यंतचा टप्पा गाठू शकल्याचं सांगण्यात येत आहे.
जगातील सौंदर्य स्पर्धांमधील सर्वात प्रतिष्ठेची म्हणून Miss Universe या स्पर्धेकडे पाहिलं जातं. विशेष म्हणजे यंदा Miss Universe 2021 या वर्षाचा किताब भारताने पटकावला आहे. पंजाबच्या हरनाज संधू हिने वातावरणाविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर देत परिक्षकांची मनं जिंकून घेतली. त्यामुळे यंदा २०२१ ची मिस युनिव्हर्स हरनाज ठरली आहे. ही स्पर्धा जिंकल्यानंतर सोशल मीडियावर हरनाज मोठ्या प्रमाणावर ट्रेंड झाली. विशेष म्हणजे तिच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते प्रोफेशनल लाइफपर्यंत प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
यामध्येच मिस युनिव्हर्स आणि हरनाज यांच्याशी निगडीत काही गोष्टी समोर येत आहेत . त्यातच एका मराठमोळ्या ट्रान्सवुमनमुळे हरनाज मिस युनिव्हर्सपर्यंतचा टप्पा गाठू शकल्याचं सांगण्यात येत आहे.
भारताच्या हरनाज संधूने सोमवारी पॅराग्वेच्या नादिया फरेरा आणि दक्षिण आफ्रिकेच्या लालेला मासवाने यांचा पराभव करुन ‘मिस युनिव्हर्स २०२१’चा खिताब पटकावला. विशेष म्हणजे हरनाज विजयी झाल्यानंतर तिने या प्रवास तिला साथ देणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानले. यामध्येच तिच्या या विजयामागे एका प्रसिद्ध ट्रान्सवूमनचा वाटा असल्याचं समोर आलं आहे.
हरनाजच्या या विजयामागे एका ट्रान्सवूमनचा मोठा वाटा होता, जो सध्या सोशल मीडियावर खूप ट्रेंड करत आहे. हरनाजने ग्रँड फिनालेसाठी ट्रान्सवूमन फॅशन डिझायनर साईशा शिंदे यांनी डिझाइन केलेला सिल्व्हर सिक्विन वनपीस गाऊन परिधान केला होता. ज्यामध्ये २१ वर्षांची दिवा खूपच सुंदर दिसत होती. फिनालेदरम्यान हरनाजने परिधान केलेला गाऊन सर्वांनाच आवडला तसेच हरनाजच्या त्या गाऊनसोबतचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.
हरनाजच्या या डिझायनर गाऊनमागे ट्रान्सवूमन डिझायनर साईशा शिंदेची मेहनत आहे.
साईशा शिंदे एक ट्रान्सवूमन असून यापूर्वी ती स्वप्नील शिंदे या नावाने ओळखली जायची. मात्र, यावर्षी जानेवारीमध्येच हरनाजच्या गाऊनचा डिझायनर म्हणून स्वप्नील शिंदेने ट्रान्सवूमन म्हणून सगळ्यांना स्वत:ची नवीन ओळख करुन दिली. त्याने इन्स्टाग्रामवर स्वतःची ओळख सायशा शिंदे म्हणून केली. करिना कपूर, श्रद्धा कपूर आणि अनुष्का शर्मा यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकारांनी सायशाचे डिझायनर कपडे परिधान केले आहेत.